*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
बुलढाणा : बुलढाणा पुन्हा एकदा राजकीय वादळाच्या केंद्रस्थानी येण्याची चिन्हे असून हे राजकीय वादळ राज्यात घोंगावणार अशी दाट शक्यता आहे. विविध कारणामुळे अधूनमधून चर्चेत असणारे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे ओएसडी सिद्धार्थ भंडारे यांच्यावर तब्बल ४.५० कोटी किंमतीची १४ एकर शेती बेकायदेशीररीत्या हडपल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.
बुलढाण्यातील तारे कुटुंबाने पत्रकार परिषद घेऊन हे गंभीर आरोप केले असून यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या हाती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाच्या तोंडावर हे आयते कोलीत मिळाल्याचे मानले जात आहे
राहुल तारे यांच्या नावावरची २८ एकर वडिलोपार्जित सामायिक शेती बुलढाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा येथे असून या जमिनीत २३ पेक्षा जास्त वारसदार आहेत. मात्र, त्यातील केवळ आठ वारसदारांनी कुणाला खबर लागू न देता १४ एकर शेती साडेचार कोटी रुपयांना छत्रपती संभाजीनगर येथील महेंद्र राऊत यांना विकल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
धक्कादायक बाब म्हणजे हा महेंद्र राऊत हे ओएसडी सिद्धार्थ भंडारे यांचा मावस भाऊ असल्याचा दावा करण्यात आला आहे. व्यवहार करताना उर्वरित वारसदारांची संमती न घेता, दुय्यम निबंधक यांच्या कथित मदतीने हा व्यवहार पार पाडल्याचा आरोप तारे कुटुंबाने केला आहे. तसेच तत्कालीन मंडळ अधिकारी विजय टेकाळे यांनी हरकती असूनही या जमिनीची नोंद महेंद्र राऊत यांच्या नावावर केल्याचे आरोप आहे. संपूर्ण कारवाई ही सिद्धार्थ भंडारे यांच्या तथा कथित दबावाखाली झाल्याचा आरोप तारे कुटुंबाने केला आहे. संबंधित अधिकाऱ्याचे कॉल डिटेल्स (सीडीआर) तपासण्याची मागणीही तारे यांनी केली आहे.
न्याय देणारे मंत्रीच आहेत तर त्यांनी प्रथम त्यांच्या विशेष कार्यसीन अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांना पदमुक्त करून निष्पक्ष चौकशी करावी,” अशी भावनिक मागणी तारे परिवाराने केली आहे. या गंभीर आरोपामुळे प्रशासकीय व राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे दरम्यान आता मंत्री शिरसाट यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष लागले आह
संबंध नाही – भंडार
तारे परिवाराने केलेल्या आरोपांशी माझा काहीच संबंध नसल्याची प्रतिक्रिया सिद्धार्थ भंडारे यांनी दिली आहे






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा