संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धा टॅलेंट हंट जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सदाशिवनगर केंद्र शाळेच्या हर्षल शहाजी पालवे याने जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवून शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे. गेली चार वर्ष या शाळेने या स्पर्धेत सातत्य राखत विविध प्रकारात उज्वल यश मिळवून सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्याचा दबदबा यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.असे प्रतिपादन तालुक्याच्या कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी श्रीमती सुषमा महामुनी यांनी केले आहे.
हर्षल पालवेच्या उज्वल यशाबद्दल त्याचे संपूर्ण कुटुंबीय व मार्गदर्शक शिक्षक यांचा सत्कार गटशिक्षणाधिकारी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. सदाशिवनगर शाळेच्या मुख्याध्यापकांचे व सर्व शिक्षकांचे त्यांनी कौतुक करून यापुढेही अशीच परंपरा चालू ठेवावी असे आवाहन केले.
याप्रसंगी नूतन विस्ताराधिकारी श्री अस्लम इनामदार श्री सिद्धेश्वर भरते सौ संध्या नाचणे,सरपंच श्री वीरकुमार दोशी उपसरपंच श्री विष्णु भोंगळे, कर्मवीर विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री फडतरे सर सर्व ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री संतोष जाधव व सदस्य आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत हर्षल चा सन्मान व सत्कार करण्यात आला यावेळी हर्षल चे आई-वडील आजोबा व कुटुंबीय उपस्थित होते त्यांचाही सत्कार करण्यात आला. श्री सिद्धेश्वर भरते विस्ताराधिकारी यांनी पालकांचे व ग्रामस्थांचे शाळेबद्दलचे सहकार्य उल्लेखनीय असल्याचे सांगून ग्रामस्थांचे कौतुक केले. शाळेच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पालवे कुटुंबीयांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना पेढे वाटण्यात आले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा