Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ४ नोव्हेंबर, २०२५

अखेर अनेक दिवसापासून प्रतिक्षेत असलेल्या राज्यातील नगरपालिका नगरपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर-- आचारसंहिता झाली लागू..

 *सोलापूर-- प्रतिनिधी*

  *आबिद बागवान*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


| मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकांची तारीख आज जाहीर झाली आहे. मात्र यामध्ये केवळ नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत.


पहिल्या टप्प्यात 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.


यामध्ये 10 ते 19 नोव्हेंबर पर्यत अर्ज भरता येणार, तर 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया आणि 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.


आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्यात नगरपंचायत आणि नगरपरिषदा पार पडणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद महानगरपालिका या निवडणुकांबाबत अद्याप अस्पष्टता आहे.


राज्यातील 289 नगरपालिका, नगरपरिषद,  नगरपंचायत तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका रखडल्या होत्या. त्यापैकी आता 246 नगरपरिषद, 42 नगरपालिका पार पडणार आहेत. तर राज्यातील 29 महानगरपालिका तसेच 331 पंचायत समित्यांच्या देखील निवडणुका प्रलंबित आहेत.


31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका कराव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणूका घोषित न झाल्याने अनेकांचा भ्रमनिरास झालाय. 


दरम्यान या निवडणुकांनंतर पुढील निवडणूका कधी जाहीर होणार याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

                       *जाहिरात*




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा