संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
ं तुळजापूर : शिवसेना तुळजापूर तालुक्याच्या वतीने आज पक्ष कार्यालयात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिवसेना संस्थापक आणि हिंदुत्वाच्या विचारांचे प्रणेते असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकांनी मोठ्या आदरभावाने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले
कार्यक्रमाच्या प्रारंभी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा स्मरण करण्यात आला. यावेळी तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव, महिला जिल्हाप्रमुख मीनाताई सोमाजी, युवा तालुकाप्रमुख गणेश पाटील, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख गणेश नेपते, शहर प्रमुख बापूसाहेब भोसले, शहर उपप्रमुख रमेश चिवचिवे, शहर संघटक नितीन मस्के, युवा शहर प्रमुख सौरभ भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवसैनिकांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात संजय लोंढे, शहाजी हक्के, स्वप्निल सुरवसे, सारिका चुंगे, भुजंग मुकेरकर, संभाजी नेपते, अजिंक्य खंदारे, सुनिल घाडगे, अविनाश रसाळ यांच्यासह शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले.
यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या आणि हिंदू समाजाच्या उभारणीसाठी केलेल्या कार्याचा उल्लेख करत त्यांच्या विचारातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. तुळजापूर तालुक्यात शिवसेनेची संघटना अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आयोजन शिवसेना तालुका इकाईने केले असून, उपस्थित मान्यवरांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करून त्यांच्या आदर्शावर चालण्याची प्रतिज्ञा केली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा