मुख्य संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
साहित्य, शिक्षण आणि समाजसेवा या तीनही क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या नूरजहाँ शेख यांना यंदाचा प्रतिष्ठित ‘भारत भूषण’ राष्ट्रीय पुरस्कार भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे येथे प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजक सचिन हळदे व सावू ज्योती फाऊंडेशन चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. देशभरातील अद्वितीय कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यासाठी दिला जाणारा हा पुरस्कार अत्यंत मानाचा समजला जातो. नूरजहाँ शेख यांनी आपल्या लेखन, अध्यापन आणि समाजसेवेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे जनजागृतीचे अविरत कार्य केले आहे.
नूरजहाँ शेख यांच्या साहित्यिक लेखनात शेतकऱ्यांची आर्थिक लूट, अनेक संपादकीय लेख, प्रभावी कथा, आणि सामाजिक भान जागवणारे लिखाण यांमधून त्यांनी प्रश्नांची धारदार मांडणी करत समाजात परिवर्तनाची चळवळ निर्माण केली.
शिक्षण क्षेत्रातही त्यांचे योगदान तितकेच महत्त्वाचे आहे. आदर्श मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी शैक्षणिक गुणवत्तेला नवी दिशा देत विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, चारित्र्य, ज्ञान आणि मूल्यांची जडणघडण घडवली आहे.
भारत भूषण पुरस्कार जाहीर होताच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून नूरजहाँ शेख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांना ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थे मार्फत फातीमाबी साहित्य रत्न पुरस्कार ,महाराष्ट्र शासनाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्कार ,काव्य सम्राज्ञी तसेच काव्यरत्न पुरस्कार ,लोकमान्य टिळक शिक्षण रत्न पुरस्कार मिळाले आहेत.
नूरजहाँ शेख यांनी या गौरवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले की,
“हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. समाजासाठी आणखी दायित्वाने आणि संवेदनशीलतेने काम करण्याची ही ऊर्जा देणारी पायरी आहे.”
देशातील सामाजिक भान असलेल्या कार्यकर्त्यांसाठी नूरजहाँ शेख यांचा हा सन्मान निश्चितच प्रोत्साहनपर ठरेल.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा