Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ९ नोव्हेंबर, २०२५

मळोली चे सुपुत्र 'डॉ.-हिमालय घोरपडे' यशाच्या शिखरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा क्रमांक

 अकलूज --प्रतिनिधी

      केदार लोहकरे

   टाइम्स 45 न्यूज मराठी



मळोली (ता.माळशिरस) येथील सुपुत्र डॉ. हिमालय बाळकृष्ण घोरपडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रात दुसरा क्रमांक मिळवून माळशिरस तालुक्याचा तसेच सोलापूर जिल्ह्याचा मान उंचावली आहे. सध्या ते अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात पुनर्वसन तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत.

              डॉ.घोरपडे हे मळोली गावचे रहिवासी असून त्यांचे वडील डॉ.बाळकृष्ण घोरपडे हे अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे प्राणिशास्त्र विभागाचे निवृत्त प्राध्यापक आहेत, तर आई सुवर्णप्रभा घोरपडे या सांगोला येथील वामनराव शिंदे विद्यालयातून सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आहेत.

          डाॅ.हिमालय यांचे प्राथमिक शिक्षण सांगोला येथे तर १२वी चे शिक्षण विवेकानंद सायन्स कॉलेज, कोल्हापूर येथे झाले.त्यानंतर त्यांनी मुंबईतील नायर हॉस्पिटल सेंटर येथे एमबीबीएस पदवी प्राप्त केली. सन २०१९ साली त्यांनी प्रथमच महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत यश संपादन करून तहसीलदार पद मिळवले.यशदा पुणे येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी हिंगोली येथे पर्यवेक्षाधीन तहसीलदार म्हणून सेवा दिली. त्यानंतर २०२२ ते २०२४ या कालावधीत अप्पर तहसीलदार म्हणून कार्यरत राहून उल्लेखनीय प्रशासनिक कामगिरी बजावली. सध्या ते २०२५ पासून अहिल्यानगर येथे पुनर्वसन तहसीलदार म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.डॉ. घोरपडे यांच्या या यशामुळे मळोली ग्रामस्थ,नातेवाईक आणि शिक्षक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा