संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
तुळजापूर : आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाची नंदगाव जिल्हा परिषद गटाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली असून, सर्व जागांवर शिवसेना पक्ष स्वयंपूर्ण ताकदीने लढणार असल्याचा ठाम निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीस शिवसेना तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी अध्यक्षस्थान भूषविले. त्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, “पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यानंतर तुळजापूर तालुक्यातील सर्व जागा शिवसेना स्वयबळावर लढवणार असून, प्रत्येक जिल्हा परिषद व पंचायत समिती गटावर भगवा झेंडा फडकवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आगामी निवडणुकीसाठी सर्व इच्छुक उमेदवारांनी आत्तापासूनच तयारीला लागावे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीदरम्यान नंदगाव जिल्हा परिषद गटासाठी शिवसेनेकडून सोमनाथ गुट्टे यांचे नाव अग्रस्थानी असल्याची चर्चा रंगली. गटातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या बैठकीस अंकुश पाटील (नंदगाव गटप्रमुख), सुनील बनसोडे (माजी सरपंच लोहगाव), आप्पासाहेब बिराजदार (माजी सरपंच दहिटणा), शंकर चव्हाण (तंटामुक्त अध्यक्ष दहिटणा), संजय घोडके, सिद्धाराम मुलगे (शाखाप्रमुख बोळेगाव) तसेच असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी पक्षाच्या बळकटीकरणासाठी विविध रणनीतींवर सविस्तर चर्चा झाली. कार्यकर्त्यांनी एकमुखाने “शिवसेना जिंदाबाद” च्या घोषणा देत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा