Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ५ डिसेंबर, २०२५

शिक्षण संचालकाच्या आदेशानुसार आंदोलनातील सहभागी शिक्षकांना मिळणार नाही एक दिवसाचा पगार-- शिक्षण अधिकारी सोलापूर

 संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:--  9730 867 448


सोलापूर : शिक्षकांच्या शाळा बंद आंदोलनात उद्या शुक्रवारी (ता. ५) सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांसह खासगी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक सहभागी होणार आहेत. पण, विद्यार्थीहित लक्षात घेऊन आंदोलनात सहभागी होणाऱ्या शिक्षकांना रजा मिळणार नाही. त्यामुळे आंदोलनातील शिक्षकांना एक दिवसाची पगार मिळणार नाही, असे आदेश शिक्षण संचालकांनी काढले आहेत. त्यानुसार आंदोलनात सहभागी शिक्षकांची माहिती मुख्याध्यापक शिक्षणाधिकाऱ्यांना देतील.

शिक्षकांनी सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या 'टीईटी' सक्तीच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी, केंद्र सरकारच्या माध्यमातून 'एनसीटीई'च्या निकषांत बदल करावेत, शिक्षणसेवक पद रद्द करावे, १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय रद्द किंवा त्यात दुरुस्ती करावी, अशा मागण्या सरकारकडे केल्या आहेत. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शिक्षकांनी उद्या (शुक्रवारी) राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांसाठी तेथे उपाययोजना करावी, अशा सूचना केल्या आहेत. शालेय पोषण आहार सर्व विद्यार्थ्यांना मिळेल, अशी व्यवस्था करण्यास देखील सांगितले आहे.

मध्यवर्ती संघटना आंदोलनापासून दूर

जिल्हास्तरावर काहीजण सर्व शिक्षक संघटना या आंदोलनात सहभागी असल्याचा आभास निर्माण करीत आहेत. मात्र, मध्यवर्ती शिक्षक संघटनेशी संलग्नित कोणत्याही घटक संघटनेने या आंदोलनात सहभागी होऊ नये, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेने घेतली आहे.

आंदोलनात सहभागी शिक्षकांना मिळणार नाही एक दिवसाचा पगार

शुक्रवारी शिक्षकांचे शाळा बंद आंदोलन आहे. पण, आंदोलनासाठी त्यांना सामूहिक रजा मिळणार नाही. शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार आंदोलनातील शिक्षकांना एक दिवसाचा पगार मिळणार नाही. दुसरीकडे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, यादृष्टीने नियोजन करण्यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांना सूचना केल्या आहेत. -कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा