*अकलूज --प्रतिनिधी*
*एहसान मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
माळीनगर येथील दि सासवड माळी शुगर फॅक्टरी या कारखान्याच्या वतीने सालाबाद प्रमाणे दि. ७ जानेवारी रोजी कारखाना गेस्ट हाऊस येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस व मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने माळशिरस तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार, सन्मान,आणि स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या पंचवीस वर्षापेक्षाही जास्त काळापासून सासवड माळी शुगर फॅक्टरी दरवर्षी पत्रकार दिन साजरा करत आला आहे.
तसेच या कार्यक्रमात माळीनगर पत्रकार संघाच्या नूतन अध्यक्षपदी रितेश पांढरे व सचिवपदी गोपाळ लावंड यांची निवड झाल्याबद्दल कारखान्याचे वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे चेअरमन राजेंद्र गिरमे, मॅनेजिंग डायरेक्टर गणेश इनामके ,संचालक राहुल गिरमे, विशाल जाधव, शुगरकेन सोसायटीचे चेअरमन अमोल ताम्हाणे,दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी अजय गिरमे, महात्मा फुले पतसंस्थेचे व्हा. चेअरमन महादेवराव एकतपूरे आदी मान्यवर उपस्थित होते तर कारखान्याचे माहिती व जनसंपर्क अधिकारी अनिल बनकर यांनी कार्यक्रमाची चोख व्यवस्था केली होती. यावेळी माळशिरस तालुक्यातील दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक तसेच विविध वृत्तवाहिनीचे व यू ट्यूब चॅनलचे प्रतिनिधी,पत्रकार बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी चेअरमन राजेंद्र गिरमे , मॅनेजिंग डायरेक्टर गणेश इनामके तसेच ॲड अविनाश काले यांनी विविध विषयांवर आपले मनोगत व्यक्त करून पत्रकारांशी सुसंवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार गणेश करडे यांनी केले तर आभार पत्रकार निनाद पाटील यांनी मानले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा