*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी**
*मो:-- 9730 867 448*
आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेना तुळजापूर तालुक्याची महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीस धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख राजन साळवी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या बैठकीत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीस इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच शिवसेनेचे तालुकास्तरीय पदाधिकारी, लाडक्या बहिणी आणि शिवसैनिक यांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली.बैठकीदरम्यान आगामी निवडणुकांची तयारी, संघटनात्मक मजबुती आणि निवडणूक रणनिती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी बोलताना जिल्हा संपर्कप्रमुख राजन साळवी यांनी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, त्या निर्णयानुसार महायुतीमध्ये निवडणूक लढण्याबाबत सर्वांनी माहितीच्या आधारे एकत्रितपणे आघाडी करून काम करावे, असे स्पष्ट मार्गदर्शन केले. पक्षाची अधिकृत भूमिका लक्षात घेऊनच पुढील वाटचाल केली जाईल, असेही त्यांनी बैठकीत नमूद केले.
यासोबतच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षशिस्त पाळून संघटन मजबूत करण्यावर भर द्यावा, तसेच महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी एकदिलाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी शिवसेना तुळजापूर तालुका प्रमुख अमोल जाधव यांनी पक्षश्रेष्ठी जो अंतिम निर्णय घेतील, त्यावरच तुळजापूर तालुक्याचे राजकीय समीकरण ठरणार असल्याचे स्पष्ट केले. पक्षाच्या आदेशानुसार सर्वांनी समन्वय राखत काम केल्यास येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना व महायुतीला निश्चित यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या आढावा बैठकीमुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी शिवसेना तुळजापूर तालुक्यात संघटनात्मक तयारीला गती मिळाली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा