Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २३ फेब्रुवारी, २०२६

रमजान मुबारक, 2026 रोजा नं :- 06 वा, मंगळवार दिनांक :- 24-02-2026 विषय:-!! "रोजा - इफ्तार " आत्मिक शब्दातीत शांतता लाभेल " !!

 लेखक :- डॉ. सलीम साईदा सिकंदर शेख 

बैतुशशिफा मल्टिस्पेशालिटी  दवाखाना 

 श्रीरामपूर

जिल्हा :- अहमदनगर 

मोबाईल :- 9271640014



पैगंबर मुहम्मद स्व.सांगतात , " जेव्हा रोजा इफ्तार कराल तेंव्हा खजूर नें इफ्तार करावे. कारण खजूर मध्ये बरकत आहे :, जर कदाचित तुमच्या कडे खजूर नसेल तर तुम्ही दिवसभराचा रोजा पाण्याने इफ्तार करावा " हदीस तिर्मिझी शरीफ ह. नं. 657).


         पहाटे 4-5 ला उठून आपल्या (हलाल ) कष्टा नें आणलेल्या अन्न  सूर्योदय पूर्वी  सेहरी करून. संपूर्ण दिवस अल्लाह(  परमेश्वर )च्या मर्जी राखण्या साठी कष्ट करून,मजुरी, नौकरी, व्यवसाय, व्यवहार अल्लाह नाराज होणार नाहीं याची प्रत्येक क्षण- क्षणी, मिनिट नं मिनिट जाणीवपूर्वक काळजी घेऊन,  अल्लाह ( परमेश्वर )ची जपमाळा दिवस भर मोजून, साक्षी फक्त्त अल्लाह ( परमेश्वर - भगवंत ) च आहेत, समोर उभा आपल्याला बघतो हें समजून( हलाल )कष्टाच्या कमायितून ऐपती प्रमाणे  फळे,  मेवे, गोड -धोड आणून संपूर्ण कुटुंबासह तसेच   भावांनीही  त्यांच्या कुवती नुसार एक -एक फळं आणून चहो बाजूला बसून,  म्हातारी आई- वडील, छोटी बहीण, एक आजारी भाऊ, लहान लहान चिमुकली छकुली,  

 महिलांनी बनवलेलं तळलेलं पदार्थ घेऊन, आजूबाजूच्या शेजारच्यानीं पाठवलेलं तळलेली पदार्थ घेऊन.

ऑफिसचा अधिकारी, कामावरील मालक धनी दिवसभर रोजा असूनही कोणत्याही कामाचा एक टक्का काम रोजच्या प्रमाणेच करत करत, रोजाचं आत्मभान राखत आत्म्चिन्त करीत नामस्मरण चालूच ठेवत आलेल्या त्या  घामाच्या कष्टाच्या फळ - खजूर नें दिवस भरातील ठेवलेल्या रोजा उपवास सोडण्याला " इफ्तार " करणे.

                  पैगंबर मुहम्मद स्व. सांगतात ," जो व्यक्ती रोजा ठेवणाऱ्याच " रोजा -इफ्तार " करतील ,  त्याला खूप जास्त सबाब ( पुण्य ) भेटेल".

                   मित्रांनी प्रश्न उपस्थित ( विचारलं )केला कीं, हुजूर ( प्रेषित ) मुहम्मद स्व. आमच्या पैकी एकाची ही आर्थिक परिस्थिती( एपत - स्थिती ) अशी नाहीत कीं आम्ही दुसऱ्याला रोजा इफ्तार साठी मदत करील. -पैगंबर ( प्रेषित ) मुहम्मद स्व.नी उत्तर दिले , " हें माझ्या मित्रांनो,पुण्याचं ( सबाब ) काम गरिबातील गरीब ही करू शकतं,  साधं शुद्ध काम आहेत, घरातील पाण्याच्या एका घोट का त्याला  तुम्हीं रोजा सोडताना दया   "  फक्त्त तुमची मनापासून मानसिकता असली पाहिजे .  अल्लाह( भगवंत - परमेश्वर ) फक्त्त तुमच्या मानसिकता पाहत असतो  ".

                      तुमच्या छोट्या - छोटया शुल्लक गोष्टीची दखल अल्लाह( भगवंत - परमेश्वर ) घेऊन  साबब ( पुण्य )देत असतात. कारण अल्लाह ( परमेश्वर)ला सृष्टीतील प्रत्येक जीवाची काळजी असते, प्रत्येकाला त्यालाच देणं आहेत.तो मग नास्तिक का असेना.

    जगात विविध सामाजिक संघटना,  राजकीय पक्ष,  काही श्रीमंत व्यक्ती,   सामाजिक भान असलेल्या विद्यार्थी संघटना,, मंडळ, सामाजिक ग्रुप, विविध पातळीवरील काही घटक, व्यक्तीगत,   माणुसकी ची जाणीव असलेल्या व्यक्ती. महिला, आपल्या आसपासच्या विविध मस्जिद,  रेल्वे स्टेशन,  रेल्वे बोगीमध्ये,  किंवा गल्ली गल्ली- गल्लीत, महामार्ग-हाय वे  रोडच्या बाजूला छोटया छोटया  टेन्ट मंडफ करून(  उपवास) रोजा  इफ्तार करण्यासाठी सोयीस्कर सोयी करत असतात.

भारतीय संस्कृती व संस्कार हीं  मानते की  अन्न दान एक महान व उत्कृष्ट दान आहेत व दान देण्यात  पुण्य ( साबब) आहेत म्हणून ते कशाच्या हीं पद्धतीने का होईना फक्त्त करणं महत्वाचं.

                        सामुदायिक रित्या बसून अल्लाह( भगवंत - परमेश्वर ) कडे दिवसभारात कळत नकळत झालेल्या चुकांची( गलती ) माफी - दया -याचना - करुणा मागनी करण्याबरोबरच संपूर्ण विश्वाची सुख - शांती- समृद्धी - सुखरूप निरोगी आरोग्यासाठी- मानवतेच्या रक्षणासाठी - बंधू भाव एकता अखंडतेसाठी   प्रार्थना- दुवा करून सोडलेल्या उपवासाला " इफ्तार  " म्हणतात...

यामध्ये  सामुदायिक एकाता - सामुदायिक एकोपा,  परस्परांची काळजी घेण्याची भावना, सहकाऱ्यांची भावना आपोआपच उपजतच निर्माण होते.

 अल्लाह ( परमेश्वर - ईश्वर - भगवंत )महामानव पैगंबर मुहम्मद स्व.ना रोज़े -सेहरी -इफ्तार  - तून हेच अपेक्षित आहेत.. इस्लामची शिक्षा -संस्कार,- संस्कृती आहेत..

रोजा ठेवून दिवसभर उपाशी पोटी घाम गाळून आणलेल्या रोजी नें इफ्तार करणं कसं शब्दातीत असेल..

एखाद्या दिवशी " रोजा -इफ्तार "करून बघा, किती आत्मिक शांतता भेटेल.!"

( 🙏मित्रांनो लेख आवडल्यास जरूर आपल्या मित्रांना नातेवाईकांना पाठवा. प्रतिक्रिया अवश्य कळवा )

लेखक :- डॉ. सलीम साईदा सिकंदर शेख 

बैतुशशिफा मल्टिस्पेशालिटी  दवाखाना 

 श्रीरामपूर

जिल्हा :- अहमदनगर 

मोबाईल :- 9271640014

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा