उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
आज दि 1/5/2026 रोजी प्राथमिक शाळा क्रमांक तीन माळीनगर गट नंबर दोन या शाळेमध्ये 67 वा महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटी माळीनगरचे विद्यमान सेक्रेटरी मा. श्री अजय मधुकरराव गिरमे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले. त्यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ.प्रतिमा प्रदीप गिरमे उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी श्री अजिंक्य गिरमे तसेच राजेंद्र भोसले, विशाल वाघ यांनी उपस्थिती लावली.
तसेच कै. श्री बाळकृष्ण मारुती गिरमे आणि कै.श्रीम. सुलोचना बाळकृष्ण गिरमे यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू श्री अजिंक्य प्रदीप गिरमे यांच्या वतीने शाळेचे गुणवंत आणि आदर्श विद्यार्थीनी म्हणून कु.शुभांगी उमेश गुजले आणि विद्यार्थी चि.शिवराज सचिन वाघ यांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल कु. प्रांजली समाधान जगताप( TSE) आणि चि. शिवम विजय भोसले ( अक्षरगंगा) यांचा कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शाळेची स्थापना 1945-46 असून दरवर्षी ध्वजारोहणाचे तिन्ही उत्सव संस्थेच्या मुख्य शाखेत मोठ्या उत्साहात साजरे केले जात होते. परंतु संस्थेचे विद्यमान चेअरमन श्री राजेंद्र गोपाळराव गिरमे व विद्यमान सेक्रेटरी श्री अजय मधुकरराव गिरमे व सर्व संचालक मंडळ यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने शाळेच्या इतिहासातील प्रथमच महाराष्ट्रदिन प्राथमिक शाळा क्रमांक तीन माळीनगर या शाळेमध्ये साजरा करण्यात आला.
हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व पालक व संस्थेचे संचालक मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.शेवटी मुलांना खाऊ वाटप करून वार्षिक निकालपत्रक देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा