Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २८ एप्रिल, २०२६

*इंदापूर क्रिएटिव्ह अकॅडमीचे राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश, इंदापूरचा शैक्षणिक आलेख उंचावला!*

 *इंदापूर, डॉ. संदेश शहा*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९*



केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत घेण्यात आलेली राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक २८ डिसेंबर रोजी संपन्न झाली  होती. सदर परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली आहे. सदर गुणवत्ता यादीतील इंदापूर तालुक्यातील २८ विद्यार्थ्यांना ४८  हजार रुपयांची  शिष्यवृत्ती मिळणार आहे. या परीक्षेत इंदापूर तालुक्यातील क्रिएटिव्ह अकॅडमी मधील वीस विद्यार्थी बसले होते. ते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यातील सहा विद्यार्थी हजार रुपये  महिना अशी इयत्ता बारावी पर्यंत मिळणारी शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेत तसेच आठ विद्यार्थी सारथी शिष्यवृत्ती साठी पात्र ठरले. यामध्ये कु. समृद्धी रामचंद्र पवार हिने १७९ पैकी १५४ गुण मिळवत तालुक्यातून पहिला क्रमांक पटकावला. कु. तनिष्का विनोद दळवी हिने १४५ गुण मिळवत तालुक्यातून तिसरी ठरली तर शेहरीश अताउरेहमान शेख हिने १४४ गुण मिळवले. कु. शिवांजली राहुल साळुंखे तसेच चि. संस्कार सुदाम मगर यांना प्रत्येकी १४० गुण, चि. आरुष नितीन मिसाळ यास ११२ गुण मिळाले. या विद्यार्थ्यांची या शिष्यवृत्ती साठी निवड झाली आहे तसेच कु. वैष्णवी हरिदास व्यवहारे यास १३५ गुण चि. समर्थ औदुंबर काळे यास १२७ गुण,  कु. प्रज्ञा बाबासो मोहिते हिला १२४ गुण चि. श्रेयश सागर भोसले यास ११५ गुण, चि. सार्थक नवनाथ गोलांडे यास ११३ गुण,   चि. रुद्र अशोक बागल यास १०५ गुण, चि. आर्यन तानाजी बोंगाणे यास १०२, चि. राजवर्धन दत्तात्रय गोलांडे यास १०१ गुण मिळाले असून हे विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.                                                                          



   सदर विद्यार्थ्यांना सौ. राणी रघुनाथ बोंगाणे मॅडम, शुभम लोंढे सर,अक्षय सावंत सर, नवनाथ काटे सर, शेख मॅडम, रूपाली सोनवल मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विद्यार्थ्यांचे नुकत्याच एमपीएससी मार्फत कृषी संचालक पदी निवड झालेल्या प्रतीक्षा शिंदे - कवडे मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. केवळ सात विद्यार्थ्यांपासून सुरुवात केलेल्या या अकॅडमीमध्ये आज १५० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जवाहर नवोदय, सैनिकी स्कूल, शिष्यवृत्ती, राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा


या परीक्षेबरोबरच यावर्षीपासून इयत्ता ९ वी ते १२ वी साठी प्रवेश देणे चालू आहे. यामध्ये फाउंडेशन, रेग्युलर अभ्यासक्रम, पी सीएमबी व जेईई, नीट, एनडीए यासारख्या देखील स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्ते बरोबरच सर्वांगीण विकासासाठी झटणारी ही अकॅडमी असल्याचे अकॅडमीचे संस्थापक रघुनाथ बोंगाणे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा