डॉक्टर :- सलीम साईदा सिकंदर शेख
बैतुशशिफा मल्टिस्पेलिटी हॉस्पिटल,
मिल्लतनगर,
श्रीरामपूर, जिल्हा :- अहमदनगर ( अहिल्यानगर )
मोबाईल :- 9271640014
" उपवासाचे (रोजाचे ) काही ठराविक (मोजकेच )दिवस आहेत,जर कदाचित, तुमच्यापैकी एखादी व्यक्ती आजारी असेल, तर तिला उपवास करणं कठीण असेल, हानिकारक असेल, किंवा एखादी व्यक्ती प्रवासात असेल, तर इतर दिवशी ( राहून गेलेले )रोजा करून उपवासा ( रोजा ) ची संख्या पूर्ण करावी, ज्या लोकांना उपवास करतांना अतिशय कठीण प्रयास करावे लागत असतील. तर त्यांच्या साठीदुसरी सोपी गोस्ट ही आहेत कीं, ज्यांची कुवत ( एपत ) आहेत त्यांनी एका गरीबाला जेवण द्यावे, आणि एखाद्याला यापेक्षा जास्त पुण्य कमावायचे असतील तर ते कार्य अधिकच त्याच्या साठी चांगलीच गोस्ट असेल, तरीही उपवास करणे तुमच्यासाठी चांगलेच आहेत, जर तुम्हाला उपवास केल्याणे फायद्याचे ज्ञान असेल. (" पवित्र कुरआन, सुरहा नं. 02 सुरह बकराह, आ. नं. 184).
आजारी व प्रवासात असणाऱ्या लोकांना अल्लाह ( परमेश्वर - ईश्वर ) राने सवलत दिलेली आहेत. फारच आजारी किंवा कठीण प्रवासात.
फेब्रुवारी संपत असून नहीं , वातावरनात एक्दम उष्णता तर कधी थंड तर वेगवेगळ्याप्रकारे हवामान चालू आहेत, वातावरणाच्या या बदला मुळे सर्दी खोकला, घसा तडतड, कधी भरपूर खोकला . काहीं ना चक्कर येत आहेत, काहीच होतं नाहीं. वातावरणातील काही दिवस असेच चालू राहणारे आहेत दहा बारा दिवसांनतर वातावरणाची सवय झाल्या नंतर रोजा सुरुळीत राहील.
काहीतरी कारणं शोधणार्यांना काही ना काही बहाणा लागत असतो शुल्लक कारणाने पवित्र रोजे सोडतात.
हजरत अबू हुरेरा रजि. सांगतात कीं, पैगंबर मुहम्मद स्व.नीं सांगितलं, जाणूनबुजून रमजानचे रोजे ( उपवास )सोडले, त्या नीं कितीही रोजे ( उपवास )ठेवलं तरी त्या रमजान मधील एका रोजाची किंमत जन्मभर कधीहीं चुकवू शकणार नाहीत ( तिर्मिझी शरीफ ).
विविध प्रकारच्या आजाराने त्रस्त आहेत उदाहरण म्हणून मधुमेही, हृदय विकार, थयोरॉईड, पॅरालिसिस, उच्च रक्तदाब, मिर्गी, रक्त गोठने, फिट येणे संधिवात, किडनी आजारा बरोबर होणारे इतर आजार. वयोरुद्ध व्यक्ती, वरील सर्व आजाराच्या रुग्णांना बाराही महिने औषधं द्यावे लागतात. अशा रोजा ठेवणाऱ्यां रोजदारांनी , रोजा दैनंदिन औषधा चे व्यवस्थित नियोजन करण्याची गरजेचं आहेत. काही वेळाकाही आजार हें सिरीयस आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्या वरच लक्षात येतात म्हणून वयोंदृद्धनीं वेळोवेळी फॅमिली डॉक्टर कडून तपासनी करून नियोजन करणं गरजेचं असतं.
जागतिक आरोग्य संघटना च्या 2003च्या सर्वे नुसार, जगातील एकूण, 19 कोटी मधुमेहीं रुग्णा पैकी एकट्या भारतात पांच(5) कोटी फक्त्त भारतातच आहेत . भारत देश हा मधुमेही राजधानी झाली आहेत होतं आहेत. भारतदेश हा साथीच्या आजाराचे माहेरघर समजलं जायचं , प्रत्येक एक घरा आड - घर दर घर एक मधुमेह रुग्ण आढळत आहेत.. लहानलहान मुलांना सुद्धा मधुमेह, हृदय विकार, ब्लड प्रेशर, असे विविध आजार बघवयास मिळत आहेत. परंतु यातील खूप आजार नियंत्रणात आणता येतात त्यासाठी नियोजन करणं गरजेचे आहेत, असो.
मधुमेही रुग्णांनी रोजा ठेवताना प्रथम सर्व रिपोर्ट करून घेणं गरजेचं असतं, उदाहरणं रक्तातील साखरेचं प्रमाण, उपाशी पोटी ( 60 ते 90/100 ) व पोटभर खाल्यावर दोन तासाने( 90-ते 140 मिलिग्राम ). असणं गरजेचे आहेत, प्रत्येक तीन ते सहा महिन्याने HbA1c ही टेस्ट करून घेणं, त्यामुळे सहा महिन्याचा साखरेचा रेश्व ratio समजतो, मधुमेही चे रोजा मध्ये कधी कधी रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होतं, शरीररातील साखरे व्यवस्था कोलंडून पडते त्यावेळी परिस्थिती फार हलख्याची आणीबाणी ची असते. इन्सुलिन इंजेक्शन घेणाऱ्या मधुमेही रोजा ठेवणाऱ्यानीं तर विशेष लक्ष देण्याची फार महत्वाचं आहेत..म्हणून तशी वेळ येऊ नयेत म्हणून नियोजन करणं महत्वाचं आहेत, त्या बरोबरच बहुतेक मधुमेहीना Blood presser ही असतो किंवा थयोरॉईड thyoroid, ही असतात म्हणून अशा रुग्णांनी सेहरी करतांना सर्व अन्न घटक मर्यादित व योग्य प्रमाणात घेणं उचित असेल, त्या बरोबर दैनंदिन रोजच्या औषधं घेणं गरजेचे आहेत परुंतु रोजा ठेवायचाच असेल आणि प्रचंड इच्छा शक्ती असेल तर इन्सुलिन चा डोस ( मात्रा ) चे प्रमाण थोडं कमी करावे, इन्सुलिन घेणाऱ्यानं आपल्या कायमच्या डॉक्टर कडून डोस ची व्यवस्थित करूनच इन्सुलिन घावी आपल्या स्वतः च्या मनाने कृपया काहीच करू नयेत. माझ्या मते मधुमेही रुग्णांनी आपल्या इन्सुलिन इंजेकशन चे डोस चे प्रमाण थोडेच ठेवावे कारण संपूर्ण महिना भर रोजे ठेवायचं असेल तर .
ज्यांना उच्च रक्तदाब, थायरॉईड, मिर्गी, चक्कर भोवळ येत असेल, झटके येत असेल, संधिवात असेल अशा रोजा ठेवणाऱ्या रुग्णांनी औषधी डोस सेहरी मध्ये अर्धी अर्धीच अर्थात कमीत डोस घ्यावीत.. संध्याकाळी इफ्तार झाल्या नंतर पुर्ण डोस घ्यावीत. ज्यांचे हृदयाची अंजिओप्लास्टि केलेली असेल व पॅरालिसिस झालेल्या रोजा ठेवणाऱ्यांनी रक्त पातळ होण्याच्या व दैनंदिन डोस जरूर घ्यावेत.
आपल्या प्रकृती नुसार आपल्या रोजा चं नियोजन करणं गरजेचे आहेत.. मी म्हणतो भिऊ नका... नियोजन करा.
प्रत्येक रोजा ठेवणाऱ्या आजारी बंधू बघीनींना विनंती आहेत की आपल्या आरोग्याची काळजी घेऊन, आपल्या स्वतःला झेपेल, सहन होईल अशी काळजीपुर्वक नियोजन करून रोजा ( उपवास ) करावेत..पर्याय भरपूर दिलेले आहेत. इस्लाम मध्ये कोणत्याही गोष्टीची सक्ती केलेली नाहीत.. कारण समाजात या बद्दल खुप गैरसमज आहेत. अल्लाह ( परमेश्वर - ईश्वर,) हा दयाळू - कृपाळू आहेत निष्टुर तर कधीच नाहीं...
(मित्रांनो लेख आवडल्यास जरूर आपल्या मित्र व नातेवाईकांना पाठवा याचा फायदा सर्वाना जरूर होईल )
डॉक्टर :- सलीम साईदा सिकंदर शेख
बैतुशशिफा मल्टिस्पेलिटी हॉस्पिटल,
मिल्लतनगर,
श्रीरामपूर, जिल्हा :- अहमदनगर ( अहिल्यानगर )
मोबाईल :- 9271640014





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा