Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १७ फेब्रुवारी, २०२६

स्पंदन त्रैमासिक बहुभाषीय अंकाचे ५ वे वर्धापन दिन कोंढवा पुणे येथे थाटात संपन्न

 उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी



बहुभाषिक साहित्यिंक एकत्रित विचार मंथनांनी  विविध भाषां माध्यमातून  सर्वांची मने जुळतील आणि राष्ट्रीय एकात्मता बळकट होण्यास बळ मिळेल व जाता - धर्मातील दरी दूर होईल असे उदगार  तिस-या स्पंदन साहित्य संमेलन "अध्यक्ष"  कवी, लेखक, गझलकार बा.ह. मगदूम यांनी 

आपल्या अध्यक्ष भाषणातून व्यक्त केले.

बहु भाषिकांमुळे महाराट्र राज्य आता आपली वेगळी ओळख निर्माण करीत आहे याचा आम्हाला अभिमान बाटतो .

बहु - .भाषिकाच्या एकत्र येऊन संमेलन साजरे होत असता  अनेक भाषिक व अनेक भाषिकांचे मने जोडण्याचे व राष्ट्रीय एकात्मतेला मजबूत करण्याचा महत्वाचा काम हे परिषद करत आहे .




स्पंदन बहुभाषिक त्रैमासिक साहित्य मंडळाच्या वतीने  बहुभाषिक साहित्य संमेलनात विविध पुस्तक प्रकाशन, पुरस्कार प्रदान , काव्य संमेलन ' पारितोषिक वितरण अश्या विविध कार्यक्रम  वेलकम हॉल येथे मोठ्या थाटाने संमेलन अध्यक्ष ज्येष्ठ कवी बा  ह मगदूम अध्यक्षतेखानी  संपन्न झाले या वेळी ते बोलत होते .

स्पंदन परिषदेचे संस्थपाक . इंतेखाब फराश यांनी सर्वांचे स्वागत केले , उपसंपादिका कवियत्रि अनिसा सिकंदर शेख यांनी प्रस्ताविक करत  उद्देश स्पष्ट केले . स्वागताध्यक्षा महेमूदा शेख यांनी सर्व साहित्यिकांचे स्वागत केल यानंतर वृक्षाता जल अर्पण करून प्राचार्य इ जा . तांबोळी .यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले यावेळी मंचावर ज्येष्ठ व्यंग चिकार खलील खान , अनिस कुट्टी , अय्यूब अहमद नल्लामंदू , बशीर काझी उपस्थित होते यावेळी सर्व मान्य वरांच्या हस्ते इंतेखाब फराश संपादित " टिफीन बॉक्स " व . दिनकर काकडे  लिखित " फातीमा शेख

तिसरी आवृत्ती " हे पुस्तक प्रकाशित झाले, ज्येष्ठ पत्रकार कासीद चे संपादक आयुब नल्लामंदू यांना पत्रकारितेचा पुरस्कार प्रधान करण्यात आला तर जेष्ठ कवी मुबारक शेख , प्रा बी एच करजगीकर , एजाज चिनीवार , तब्बसुम शेख, प्रा सुसूफ शेख यांना " फख्रे मिल्लत जीवन गौरव " पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर शीघ्र कवी म्हणून कवयित्री प्रतिभा विभुते यांना सन्मानित करण्यात आले. या नंतर अनिस कुट्टी , सदानंद माळी , बा ह मगदूम , प्रा तांबोळी , दिनकर काकडे , सदानंद  माळी यांनी साहित्याच्या विविध पहलू वर विचार मांडत मार्गदर्शन केले त्या नंतर विविध स्पर्धेते पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आले . सर्वात शेवटी सायरा बानू चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवीचा  कवी संमेलन झाले . कवींची कविता म्हणजे त्या त्या युगाचा ऐतिहासिक दस्तावेज असतो म्हणून कवींनी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना व परिस्थितीवर प्रहार करणार लेखन करावे असे अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या. सुत्र संचलन नंदनी काळे ॲड. राजश्री बोडेकर , गौसपाशा शेख यांनी केले तर आभार मिनहाज शेख यांनी मानले .

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक मुस्लीम कबीर , जाफर बांगी , शकील जाफर मंचर , तहसीन सय्यद , सदानंदन माळी , दत्ता वालेकर , साईनाथ राहरटकर , शबाना गुलजार शेख , अनिस मुलाणी,, संगीता लाड , तनवी वाघ, श्रीराम वाघ, शौकत मुलाणी संगीता लाड ,त रमेश हनुमंत, रेखा दुसाने ,सुनीता पडवळ, प्रतिभा विभुते चंद्रकांत जोगदंड, विनोद आष्टुळ  इत्यादी मान्यवर कवी , कवयित्रीनी एकसे बढकर एक  कविता, गझल सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली   व कविसंमेलन रंगत आणली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा