*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश साहेब यांच्या आदेशान्वये करमाळा पोलीस स्टेशन ने चोरीस गेलेल्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यातील हस्तगत केलेला सोन्याचा मुद्देमाल संबंधित फिर्यादीच्या स्वाधीन केला आहे
करमाळा पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हा क्रमांक 788 / 2024 कलम भा. न्या.सं.कलम 305(अ),अन्वये दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना करमाळा पोलीसांनी आरोपी रामेश्वर जंगल्या भोसले राहणार पांडेगव्हाण तालुका आष्टी जिल्हा बीड यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता आरोपीने सदर गुन्ह्यात चोरी केलेला सोन्याचा मुद्देमाल स्वतःच्या ताब्यात असल्याचे कबूल केले.
त्यानंतर आरोपीने सदरचा सोन्याचा मुद्देमाल हा काढून दिला असून पोलीसांनी तो मुद्देमाल हस्तगत केला. हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये 07 ग्रॅम वजनाची सोन्याची ठुशी व 08 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दोन फुले.किंमत रुपये 210000(दोन लाख दहा हजार रुपये)/- इतकी आहे.
सदर हस्तगत मुद्देमाल हा मा. न्यायालयाच्या आदेशानुसार फिर्यादी अभिजीत जीवन सरडे राहणार कंदर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर यांना परत देण्यात आला आहे. त्यामुळे फिर्यादी यांनी पोलीसांचे आभार व्यक्त केले आहेत.
सदर गुन्ह्याचा तपास माननीय अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण , मा. प्रीतम यावलकर अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, मा. अंजना कृष्णा व्ही.एस. सहायक पोलीस अधीक्षक करमाळा उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली रणजीत माने पोलीस निरीक्षक करमाळा पोलीस ठाणे, API/गिरीजा मस्के, मनीष पवार, मिलिंद दहीहंडी, अमोल रणदिल, अर्जुन गोसावी, संदीप कवडे, रविराज गटकुळ यांनी केला आहे.
पोलीस प्रशासन नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी सदैव कटिबद्ध असून गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे. तसेच दुसऱ्या घटनेतील मुद्देमाल
करमाळा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 926/2025 भारतीय न्याय संहिता-2023 चे कलम 74,75(2),316(2) प्रमाणे दाखल गुन्ह्यामध्ये गेलेला मुद्देमाल त्या मध्ये *1)4 ग्रॅम 990 मी.ली. वजनाची सोन्याची पीळ्याची अंगठी* हे मा. अतिरिक्त सत्र न्यायदंडाधिकारी साहेब बार्शी यांचे आदेशान्वये आज रोजी फिर्यादी नामे मन्नाबी हरून शेख ,राहणार करमाळा,तालुका -करमाळा, जिल्हा सोलापूर यांना रोजी परत दिला आहे.
करमाळा पोलिसांनी वेळीच सावधगिरी बाळगून दोन वेगवेगळे घटनेतील आरोपींच्या कडून सोन्याचा मुद्देमाल जप्त करून सदरचा मुद्देमाल फिर्यादीच्या स्वाधीन केल्याने करमाळा पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून विशेषता कौतुक केले जात आहे





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा