*इंदापूर, डॉ. संदेश शहा*
*टाइम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. 9922419159*
कवीच्या दूरदृष्टीतून तसेच अंतकरणातून कविता निर्माण होत असतात. त्या कविता वाचून, ऐकून मनुष्याने आपले जीवन यशस्वीपणे रंगवणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व हास्य कवी अशोक नायगावकर यांनी केले.
अखिल भारतीय मराठा महासंघ व छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्त आयोजित राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेतील प्रथम पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भिगवणचे सरपंच गुराप्पा पवार हे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज तसेच राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी प्रायोजक प्रतिनिधी म्हणून भिगवण येथील श्रीनाथ पतसंस्थेचे चेअरमन पराग जाधव, शेटफळ गढे येथील गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर व सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव उर्फ माऊली नरहरी भोसले, भिगवण येथील हॉटेल आयर्न अँड लॉजिंग तसेच हॉटेल विहान रेस्टोबारचे संचालक संदीप शेठ वाकसे,
मदनवाडी येथील हॉटेल विश्वजीत व व्यंकटेश लॉन्स चे संचालक नानासाहेब बनगर हे उपस्थित होते.
श्री. नायगावकर पुढे म्हणाले, व्याख्यानमाला प्रबोधनाचे एक साधन असून अशा व्याख्यान मालेत कवींचा सुद्धा समावेश झाला ही गर्वाची बाब आहे. हास्य कविता वाचून किंवा ऐकून मानवातील नकारात्मकता नाहीसी होऊन तो सकारात्मकतेने जीवन जगू शकतो. हास्य हे जीवनाचे खरे गमक आहे. तेव्हा कविताच्या माध्यमातून मानवाने जीवनाचा आनंद घ्यायला पाहिजे. स्त्री पुरुषांच्या जीवनातील ताणतणावाचे हलके फुलके प्रसंग, पुणे मुंबईतील साम्य किंवा फरक दाखवणाऱ्या कविता वाचून दाखवून त्यांनी श्रोत्यांची मने जिंकली.
यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, व्याख्यानमाला या समाज प्रबोधनासाठी आयोजित केली जाते, मात्र व्याख्यानमालेमध्ये युवापिढीचा सहभाग असणे गरजेचे आहे. कारण युवापिढी ही व्याख्यानमालेतील चिंतनाने प्रगल्भ होते. त्यामुळे हा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत कृषी मंत्री भरणे यांनी व्यक्त केले.
प्रकाश ढवळे, मानसिंगराव जाधव, अर्जुन शिरसट, डी. एन. जगताप, पद्माकर माडगे, प्रा. रामदास झोळ, पराग जाधव, विकास वाघ, डॉ. माधवराव नाईक निंबाळकर, भरत मोरे, डॉ. संजय भोसले, संजय जगताप, डॉ. जयप्रकाश खरड, अजित रानदिवे, राजेंद्र धांडे, अनिलराव काळे, शहाजीराव कदम, नारायण खेसे, डॉ. गोरख गुळवे व दत्तात्रय नावडकर या मराठा महासंघाच्या मार्गदर्शकांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत व सत्कार केला. प्रास्ताविक डॉ. संकेत मोरे, परिचय वाचन विजयकुमार गायकवाड, सूत्रसंचालन सुहास गलांडे तर आभार प्रदर्शन पांडुरंग वाघ यांनी केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा