*कळंब-धाराशिव, प्रतिनिधी*
*बिलाल कुरेशी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
परंडा, दि. 18 फेब्रुवारी 2026 रोजी संत मीरा पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोगते आणि गीते सादर करून दहावीच्या विद्यार्थ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
दहावीच्या विद्यार्थ्यांनीही आपल्या भावना व्यक्त करत शाळा, शिक्षक आणि मित्रांसोबत घालवलेले क्षण कधीही विसरणार नसल्याचे सांगितले. काही विद्यार्थ्यांचे मनोगत ऐकताना वातावरण भावूक झाले.
कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी संस्थापक डॉ. प्रतापसिंह पाटील होते तर प्रमुख पाहुणे शाहीर शरद नवले, प्रियांका काशीद, दीपाली काशीद, नजमीन शेख, असमा शेख, रुबीना शेख,प्रगती कोचिंग क्लासेसचे संचालक कृष्णा भागडे, दादासाहेब थिटे, मेजर सतीश शिंदे, निजामोद्दीन मुजावर,अजीम मुजावर, फरीद शेख, सलीम मुजावर, फिरोज पठाण, इरफान शहाबर्फीवाले, अयुब चौधरी, शफिक शेख, कासीम बोराटे , डोंबाळे सर, पवार सर, सुदाम ओहळ, शिवाजी बनसोडे इ. मान्यवर उपस्थित होते. शाहीर शरद नवले सर यांनी विद्यार्थ्यांना अतिशय अप्रतिम व शेलक्या शब्दात प्रेरणा व स्फूर्ती देणारे भाषण देऊन परीक्षेचा ताण- तणावच कमी केला.
संस्थाअध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी विद्यार्थ्यांना आगामी परीक्षांसाठी आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा सल्ला देत प्रामाणिक परिश्रम आणि शिस्त यशाची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. तसेच जीवनात मोठी स्वप्ने बाळगा आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा, असा संदेश दिला.स्वयंशासन दिनी मुख्याध्यापक म्हणून कु. आवेज मुजावर, उपमुख्याध्यापक कु. सुहानी ओहाळ, पर्यवेक्षक कु.वैष्णवी शिंदे तर क्लार्क म्हणून कु. मुज्जमील शेख या विध्यार्थ्यांनी काम पहिले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. हसऱ्या-डोळ्यांतून अश्रू आणि गोड आठवणींची शिदोरी घेऊन दहावीच्या विद्यार्थ्यांना सर्वांनी भावपूर्ण निरोप दिला. मुख्याध्यापक संतोष भांडवलकर यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन माधुरी नांगरे व समाधान शिंदे यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन इ 9 वी चे विद्यार्थी, गणेश कोकाटे, सुमय्या शेख, बालाजी गोरे यांनी तर सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा