Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १७ मार्च, २०२६

*रमजान मुबारक 2026* *रोजा नंबर 28 वा* *बुधवार दिनांक 18-03-2026* *विषय:- " उस मिट्टी की हवा सें* "*मोहब्बत की सुगंध( बू ) आती है* " *प्रेषित मुहम्मद स्व.*

 *डॉ सलीम सिकंदर शेख*

*श्रीरामपूर* 

*मोबाइल:-9271640014*


प्रेषित मुहम्मद स्व. सांगतात " वतन से मुहब्बत ये तुम्हारे इमान की आलामत है ". 

प्रेषित मुहम्मद स्व. सांगतात, की, " तुम्हीं कुठेही असू दया, त्या मातीशी वतना शी प्रेम करणे हें तुमचं कर्तव्य आहेत " 

              पवित्र कुरआण  मधे सांगते , " पृथ्वीवर सुधारणा घडवून आणा , सुधारणा केल्या नंतर , कलह , उपद्रव माजवू नका .  अल्लाहा चे भय बाळगुन सत्कर्मे करीत राहा , अल्लाहा सत्कर्म करणाऱ्यां बरोबरच आहे  "( अल-आराफ -५६). ,   "परवानगी दिली गेली युद्ध करण्याची ,ज्या लोकांवर अत्याचार केले गेलेत  , कारण ते अत्याचार पीडित आहेत " (सुरह नं.२२ अल- हशर -आ.नं.३९).

     




                      " २३ मार्च  1931 ची तारीख कोण विसरणार   , आज 18- मार्च 2026,  म्हणजेच पाचच दिवसांनी 23 मार्च येणार  ,    भारतीय उपखंडातील स्वातंत्र्य चळवळींतील स्वातंत्र्य सैनिकांच्या २३ मार्च ही तारीख कधीच विस्मृतीत जाउ शकत नाहीत... हे सत्य आहेत ,   दंतकथा वगैरे नाहीत . तरुण तडफदार युवकांचे भारत मातेसाठी बलीदान कोण विसरेल ? ,    त्यांच्या मनात विचार जरी आला असता की अपण मायबाप सरकारची माफी  मागून जीवनभर मौज मजा करू व संसंरातील सुखं सोयी उपभोगू शकलो असतो,  परंतु, ते   रक्तच  असं असतं की चैन बसू देत नाही व नव्हतं  ,  तर देश स्वतंत्र झालाच नसता ,  तारुण्याच्या उंबरठ्यावर   देशासाठी, या  मातृभूमी  साठी.. कॉमरेड  भगतसिंग ,  राजगुरू आणि  सुखदेव  या तरुणांनां तारीख " २३ मार्च १९३१"  जागा "लाहोर येथील सेंट्रल जेल.." हल्ली म्हणजे आजच्या पाकिस्तान "नात   तरुणांना जाहीर फाशीची शिक्षा  दिली गेली,   आजुबाजुला " इन्कलाब जिंदाबाद -इन्कलाब जिंदाबाद -च्या घोषणांनी लाहोर शहरासह  अखंड देशच  " इंकलाब जिंदाबाद" च्या घोषनेने दुमदुमून गेला. असे असंख्य संख्येने  सर्व धर्मा- जातीचे  स्वातंत्र्य सैनिकांचे बलीदान स्वातंत्र्यासाठी कारणी लागली आहेत.

     भारत देश १५ ऑगस्ट १९४७  रात्री स्वातंत्र्य मिळवून , पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरूजींनी लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज उंचावून मानवंदना दिली, ती  रात्र  रमजानची  लैलतुल -कद्र ची २७ वी मध्यरात्र  व दिवस  होता शुक्रवारचा  आणि पवित्र रमजान मुबारक महिना तील  27 वी तराविह मध्ये पवित्र कुर आन  समाप्ती ( खत्मल कुराण) ची रात्रं होती .

                 दिव्य कुरआन सांगते,    " आम्ही ज्या मातृभुमी  ( वतन ) त देशात  राहतो, त्या  भुमीशी , देशाशी ,वतनाशी , प्रामाणिक एकनिष्ठ , वचनबद्ध राहावे ..व त्या देशा( वतना) वर आलेल्या प्रत्येक संकटात प्राणपणाने लढावेत  ;  त्यात  लढता - लढता  शहीद ( वीर गतीला प्राप्त) झाले   तरी  (वीरश्री) शहीद पत्करावे .शहीद जरी झाले तर शहीद व्हावे ...".

            प्रेषित मुहम्मद स्व. सांगतात  , " वतनाशी , देशांशी , मातृभूमी साठी मरण आले तर शहीद म्हणून मारताल, संबोधले जातील ".

               पुन्हा प्रेषित मुहम्मद स्व , सांगितले , " शहीद " हा तात्काळ स्वर्गात ( जन्नतुल फिरदौस) त जातो,  जागा भेटते  ",  शहीदां" च्या रक्ताचा फक्त एक थेंब जमिनीवर सांडण्या- पडण्यां आगोदरच  अल्लाहा ( ईश्वर)  त्या  शहीदाला स्वर्गा ( जन्नतुल फिरदौस) चे दरवाजे ताबडतोब उघडलें जातात. " 

         शहीदांचां , दिव्य कुरआन मधे वारंवार गौरव केलेला आहे  .  हादिस मधे हीं पुष्कळ ठिकाणी नमुद   केलेले आहे .

               पवित्र कुर आन व प्रेषित मुहम्मद स्व .सल्लमांच्यां मातृभुमी (मुस्लिम वतनपरस्ती  ) च्या बलीदानाच्या इतक्या महत्त्वाच्या शिकवणीनुसार भारतीय स्वातंत्र्य  लढ्यात  लाखों मुस्लिमांनी सहभाग घेतला . भारत भुमीच्या रक्षणासाठी लाखों संख्येने मुस्लिम समाजातील लोकांनी बलिदान (शहीद ) दिले आहेत. परंतु इतिहासातील एकाही पुस्तकात मुस्लिम स्वतंत्र सैनिकांची साधी नोंदही घेतली गेली नाही.

         दिव्य कुरआन मधील अल्लाहाच्या आदेशानुसार , " मातृभुमी (वतन ) मधे  जो कोणी अत्याचार करेल ,   लोकांना नाहक त्रास देतील , नाहक अत्याचार करतील , बळी घेतील त्यांच्या विरोधात लढा ".

                 इंग्रजांच्या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी   व त्यांच्या त्रासातून मुक्तता करण्यासाठी  दिव्य कुरआण च्या  आदेशानुसार लाखों मुस्लिमांनी बलीदान  स्वीकारलेत.

          विल्यम फ्रेजर च्या हत्याकांडात ३ ऑक्टोबर १८३५ ला करीम खां , व , ७ ऑक्टोबर १८३५ ला शमसुददीन खान ला दिल्ली गेट वर खुल्या मैदानात फाशी देण्यात आली. 

असं काही काही विचारवंतांच्या वाचण्यात आले की , दिल्ली शहरात जेवढी झाडं होती  त्या प्रत्येक झाडाला एक मुस्लिम स्वातंत्र्य सैनिकांचे प्रेत लटकावून ठेवलं होतं,  संपूर्ण दिल्ली शहरात   इंग्रज सरकारने एक प्रकारे दहशत निर्माण केली गेली  . हे बहुतेक इतिहासाच्या पुस्तकात नोंदच नाहीत.

    १८५७ च्या पहील्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व शेवटचे मुघल सम्राट बहादुरशहा जफर सहाबां कडे सर्वांनी मिळून दिले .   विरगंणा राणी लक्ष्मीबाई , तात्या टोपे ,  पेशवे व शिंदे , ई. भारतातील बहुतेक संस्थानिक राजांनी त्यांच्या कडे  स्वतः हुन नेतृत्व बहाल केले असताना ,  त्याच स्वातंत्र्य संग्रामात बादशाह बहादूर शहा जफर यांचा पराभव झाल्या मुळे त्यांना पकडून कैद करून ब्राम्हदेश हल्ली चं म्यानमार च्या राजधानी रगुन च्या जेल मधे काळया पाण्याची सजा सुनावली.   खुप  छळ - त्रास दिला गेला .  आणि त्याच वेळी इंग्रज सरकारनी त्यांच्या( बहादूर शहा जफर यांच्या दोन मुलांना कैद करून त्या दोन मुलांची मुंडके  कापून -कलम ( छाटून ) करुन ,  बहादूर शहा जफर यांच्या समोर एका थाळीत सजून आणले .   बापासमोर एका थाळीत सजून दोन मुंडके  आणलीत ,आपल्या दोन मुलांचे मुंडके बघून कसं वाटलं असेल ,  यावर बादशहा  बहादुरशहा जफर यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न वारंवार  केला गेलाय. परंतु त्या ब्लॅकमेल चा काहीच परिणाम होऊ न देता , मातृभुमीशीनाळ घट्ट बांधलेल्या  व आपल्या मातृभुमीशी इमान इतबार व आपल्या हृदयापासून -प्रेम करणारा  बादशहा बहादूर शहा जफर वर किंचित सा ही परीणाम झाला नाही.   ,त्या इमानवाल्या बादशहा ने जन्मठेपाच्या शिक्षेचा  स्विकार केला ;  परंतु देशाशी गद्दारी केली नाही .ऱगून मधील जेल मध्येच मृत्यू पत्करला. परंतु आपल्या मातृभूमी शी इमानदारी  राखून . बादशहा बहादुर शहा जफर यांची इच्छा होती की,  माझ्या मृत्यूनंतर माझा देह( मृत शरीर )  माझ्या हिंदुस्थान च्या भूमीतच दफन करावं ,  मातृभुमीच्या जमीनीतच दफन करण्यात यावे. हीं मनातील इच्छा इंग्रज सरकारने मानली नाही. परंतु इंग्रज सरकारने ही अट मान्य केली नाही . शेवटी रंगुन च्या जेल मध्येच त्यांचा मृत देह दफन करण्यात आला, हिंदुस्थान च्या शेवटच्या मुघल बादशहा बहादूरशहा जफर आजही रंगुनच्या मातीत दफन आहेत .  आपल्या भारताचे माजी पंतप्रधान आदरणीय राजीवजी गांधी हें पंत प्रधान मंत्री असताना त्यांनी  म्यानमार  मधील रंगून येथे जावून दफनभूमीतील माती भारतात आणून  दिल्ली येथील दफन भूमीत भारतीय मातीत दफन करून त्यांची अखेरची इच्छापूर्ती करण्याचा  प्रयत्न केला. 

 हिंदुस्थानच्या शेवट च्या मुघल बहादुरशहा जफर यांनी मातृभुमीसाठी " शहीद" बलीदान होवून जन्नतुल फिरदौस चे हकदार झालेत.

  पंजाब प्रांता च्या जालियनवाला बाग मधील जनरल डायर ने केलेल्या हत्याकांडात , मृत्यूमुखी झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात  मुस्लिमांची संख्या पुष्कळ प्रमाणात होती .

         रायतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात, साठ टक्के मुस्लिम मावळे मोठ्या पदावर कार्यरत होते. त्या सर्व मुस्लिम मराठी मावळ्यांनीं आपल्या राजा बरोबर  इमानेइतबारे आपली वतनपरस्ती शेवट पर्यंत निभावली. 

          कर्नाटकातील म्हैसूर चे टिपु सुलतान हे कट्टर देशभक्ती निभावताना इंग्रजांशी लढत  शहीद  झाले . म्हणूनच घटना तज्ञ महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर  यांनी लिहिलेल्या  संविधानाच्या पहील्याच पानावर स्वातंत्र्यवीर शहीद टिपू सुलतान यांचं तैलचित्र छापून त्यांचा येथोचित्त सन्मान -गौरव केला. 

         भारतीय स्वातंत्र्याचे ढगधगते जहाल मताचे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौज मधे प्रमुख पदाधिकारी म्हणून पुष्कळ मुस्लिम सैनिक  फौजेत होतें. 

      हा इतिहास आहे , परंतु काही मुस्लिम द्वेशी  इतिहासकार,  लेखकांनी मुस्लिम द्वेष फैलावण्यासाठी इतिहास ची मांडणी आणि लेखणीतून त्यांच्याच पध्दतीने केली. आणि आज हीं मुस्लिम द्वेष करणारे करितच आहेत.. आता त्यांना कोणी रोखावे. असो.

जगात  जिथे  कुठेही आणि कोणत्याही देशात मुस्लिम स्थायिक आहे , त्या प्रत्येक देशात मुस्लिमांनी आपल्या  त्या त्या देशाशी इमानेइतबारे प्रमाणिकपणे  वतनपरस्तीच निभावली आहे .

     भारतीय मुस्लिमांनी  पारतंत्र्यातील इंग्रजांच्या अत्याचाराला ,त्रासाला, छळाचा , कडाडून विरोध करून मुह तोड जबाब  वेळोवेळी दिलें आहेत व इंग्रजांच्या जोखडातून भारत देशाला मुक्त करण्यासाठी लाखों  मुस्लिमांनी  बलिदान देऊन   भारतीय मातीतच दफन झाले  आहेत . 

            " २३ मार्च 1931 हा शहीद " दिवस  म्हणून पाळला - मानला जातो..शहीद भगतसिंग यांच्यां इंग्रज सरकार विरोधातील आंदोलनात त्यांना गुप्त ठिकाणी बातम्या व जेवण घेउन जाणाऱ्यात  नसिम चंगेजी , त्यांच्या साठी वकील म्हणून लढणारे  मुस्लिम वकील  व ज्यांच्या न्यायालयात खटला चालू होता ते  न्यायाधीश आगा खान  होते . परंतु न्यायाधीश आगा खान वर  दबाव  वाढत चालला होता की  कोणतीही दया माया नं करता फाशी चीच शिक्षा घ्यावी म्हणून त्या आगा खान यांनी शिक्षा सुनावण्याआगोदर त्यांनी भगतसिंहांसाठी राजीनामा दिला..असो...

भारत स्वातंत्र्य होण्यासाठी सर्व जाती- धर्माच्या जनतेने सहभाग घेतला होता.

एकदा पैगंबर ( प्रेषित ) मुहम्मद स्व. यांनी आपल्या सहकारी मित्रांना म्हटले होतें, " मला ( मुझ को )त्या मातीतून (हिंदुस्थान)  (  मिट्टी ) हवेतून मोहब्बत की  सुगंध( बू )आती है. "

       भारत देश स्वतंत्र झाला तो दिवस 15 ऑगस्ट 1947 च्या दिवशी रमजान मुबारक ची लैलतुल कद्र 27 (सत्तावीस ) ची रात्रं होती.......

( मित्रांनो लेख आवडला तर नक्कीच नातेवाईक व मित्रांना पाठवा . आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. कॉपी पेस्ट करू नयेत ). 


लेखन :- डॉ सलीम सिकंदर शेख

 बैतुशशिफा मल्टिस्पेशालिटी दवाखाना 

श्रीरामपूर 

मोबाइल:-9271640014

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा