Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २७ एप्रिल, २०२६

*अकलूज येथील "अजीम हाजी नुरहसन सय्यद" यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*

 *अकलूज-- प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


अकलूज येथील नामांकित शिक्षक नूर हसन सय्यद गुरुजी (थोरले )यांचे ज्येष्ठ चिरंजीव अजीम हाजी नूर हसन सय्यद यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले मृत्यू समयी ८१ वर्षांचे होते त्यांच्या पश्चात पत्नी २  मुले  २ मुली सुना नातवंडे असा परिवार आहे 

    अकलूज येथील मुजीब सय्यद, आणि इमरान सय्यद यांचे वडील आणि सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग मुख्य संघटक सरचिटणीस साजिद भाई सय्यद आणि सामाजिक कार्यकर्ते अमजद सय्यद यांचे ते ज्येष्ठ बंधू होते 

   मरहुम अजीम हाजी नूर हसन सय्यद याच्या तीन बहिणी असून या तिन्ही भगिनी जिल्हा परिषद शाळेच्या सेवानिवृत्त शिक्षिका आहेत तसेच त्यांचे एक बंधू निवृत्त सिव्हिल इंजिनियर आणि दुसरे  बंधू मालट्रकचे मालक आहेत 

   त्यांच्या प्रेमळ आणि मनमिळाव स्वभावाने ते सर्वत्र परिचित होते 

 दिनांक २७  एप्रिल रोजी अकलूज येथील  दफनभूमीत त्यांचा अंतिम दफनविधी करण्यात आला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा