Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १७ मार्च, २०२६

*पांडुरंग सिगेदार यांची राष्ट्रीय* *अजैविक ताण व्यवस्थापन* *संस्थेच्या व्यवस्थापन समितीवर* *नियुक्ती*

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

टाईम्स 45 न्यूज मराठी 

सहसंपादक, मो. 9922419159



भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती च्या व्यवस्थापन समितीवर  पांडुरंग दिनकरराव सिगेदार यांची तीन वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती ही राज्यातील कृषी संबंधित अधिकाऱ्यासाठी अभिमानाची मानली जात आहे. याच संस्थेच्यासाठी जागा निवडण्याच्या समिती मध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियानचे प्रतिनिधी म्हणून सिगेदार यांनी काम केलेले आहे. मागील ३५ वर्षाच्या कालावधीत त्यांनी फलोत्पादन आणि जलयुक्त शिवार, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन, परिसंवाद व प्रवास दौरे, विधीमंडळ कामकाज आणि सहकार विभागात कामकाजाचा अनुभव आहे. इंदापूर तालुका कृषी अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी नीरा, भीमा खोऱ्यातील शेतकऱ्यांना शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहन दिले. राजकीय व सामाजिक आणि प्रशासकीय कामाचा अनुभव संस्थेच्या व्यवस्थापन समिती मध्ये निश्चितच होईल अशी आशा आहे.

सदर नियुक्ती २०२६ ते २०२९ कालावधीसाठी करण्यात आली आहे. बारामती येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था आगामी काळातील कृषी संशोधन आणि त्याची उपयोगिता हवामान बदलाच्या अनुषंगाने महत्वाची भूमिका बजावणार आहे. यासंस्थेच्या व्यवस्थापन समिती वरील नियुक्ती बाबत पांडुरंग सिगेदार यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा निश्चित फायदा होईल.

या निवडीबद्दल राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, भाजप नेते प्रदीप गारटकर, दयानंद व्यवहारे, गणेश सूर्यवंशी आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा