Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २७ एप्रिल, २०२६

*राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय!* *अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे घेणार परत;*


*मुख्य संपादक* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9730867448*





Ladaki Bahin : लाडकी बहीण योजना बंद होईल. मात्र, त्यानंतर सरकारकडून स्पष्ट करण्यात आले की, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी काही नियम आणि अटी सरकारने लागू केल्या होत्या. मात्र, अपात्र असलेल्या महिलांनी देखील या योजनेसाठी अर्ज केला. सरकारनेकेवायसी करण्याचे आदेश काढले.

आता लाडकी बहीण योजनेबद्दल धक्कादायक माहिती पुढे येत आहे. सरकारकडून लाडक्या बहिणींना मोठा धक्का देण्यात आला. अपात्र असलेल्या लाडक्या बहिणींकडून 11 कोटींची वसुली नुकतीच करण्यात आली. या योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांकडून वसुली करण्याचे काम सरकारकडून सुरू करण्यात आले.

राज्यातील 12915 लाभार्थी हे अपात्र आढळून आले आहेत. त्यापैकी 6457 महिलांकडून आतापर्यंत 11 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली. सरकारकडून हा मोठा धक्का देण्यात आल्याचे कळत आहे. महिला व बालकल्याण सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांनी ग्रामविकास विभागाकडून अहवाल मागवला. त्यानुसार, ही कारवाई केली जात आहे.

लाडकी बहीण योजनेत महत्वाची अट होती की, लाडकी बहीण योजनेसाठी सरकारी कर्मचारी महिला अर्ज करू शकत नाही. मात्र, अनेक सरकारी नोकरी करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केला. आता हळू हळू याबाबतची माहिती पुढे येत आहे. थेटपणे या लाडक्या बहिणींकडून सरकारकडून वसुली केली जात आहे.








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा