Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १२ मे, २०२६

*स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराकरिता प्राधान्य द्या माजी सैनिक शिवाजी सावंत यांची मागणी*

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9730867448*


आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी सैनिक शिवाजी सावंत यांनी त्यांच्या मागणी निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव जिल्ह्याचे प्रवेशद्वार म्हणून तुळजापूर तालुक्यातील मौजे तामलवाडी येथे मागील ०४ चार दशकांपासून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या कंपन्यांना सुरू करण्यापूर्वी  स्थानिकांनी आरोग्याचा विचार न करता धोका स्वीकारून विनाशर्त तामलवाडी ग्रामपंचायतद्वारे नाहरकत प्रमाणपत्रे त्या त्यावेळी देण्यात आली त्यामागे उद्देश होता की, तामलवाडी भागात रोजगार निर्माण होऊन नवीन सुशिक्षीत बेरोजगार युवकांना नोकरी व व्यवसायांच्या संधी तयार करणे जेणे करून स्थानिक भूमिपुत्रांना हाताला काम मिळेल आणि त्यांचे उत्पन्न वाढेल, शेतीपूरक  व्यवसायांना व शेतकऱ्यांच्या टाकाऊ पदार्थांना पैसे मिळतील, कंपन्यांमुळे तामलवाडी परिसरातील शेतकऱ्यांचे व सर्व लोकांचे राहणीमान सुधारेल, नवीन रस्ते, घरे, राहण्यासाठी इमारती बनतील ज्यामुळे शेकडो प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराची निर्मिती होईल. ज्यावेळी रोजगार निर्माण होईल म्हणजे नोकऱ्या देणे नाही तर लोकांना स्वावलंबी बनवणे परंतू आज मी आपणास खेद व्यक्त करून सांगू इच्छितो की, तामलवाडी परिसरातील परिस्थिती पहिली असता कंपन्यांमध्ये परराज्यातील कामगारांना रोजगार निर्माण झाला असून प्रत्येक कंपनी लेबर कॉन्ट्रॅक्ट धर्तीवर परराज्यातील कामगारांना येथे घेऊन आलेले आहेत.       


                                              ज्यामुळे भूमिपुत्रांना, परिसरातील शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांना रोजगार शोधत मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या ठिकाणी जाण्याची वेळ आल्यामुळे धाराशिव जिह्यातील शासकीय यंत्रणेतील जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, गटविकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूर, ग्रामपंचायत कार्यालयांना श्री सावंत यांनी विनंती केली आहे की, मौजे तामलवाडी येथील परिसरातील सर्व कंपन्यांमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नोकर भरतीच्या स्थानिक उमेदवारांना प्राधान्य या शासनादेश धर्तीवर शैक्षणिक पात्रतेनुसार स्थानिक भूमिपुत्रांना तेथेच हाताला रोजगार मिळाला पाहिजे त्याकरिता प्रत्येक कामगार हा स्थानिक भूमिपुत्र असला पाहिजेल हा ठराव मंजूर करून ही सक्ती करा की, ज्या कंपन्या हा आदेश मानत नसतील त्या कंपन्यांवर शासकीय कार्यप्रणालीनुसार कारवाई करण्यात यावी जेणे करून भूमिपुत्रांना न्याय मिळेल याबाबत परिसरातील सर्व शेतकरी, सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी समर्थन दर्शवून या मुद्द्याची खूप चर्चा करत आहेत त्याबाबत श्री सावंत यांनी समाधान व्यक्त केलं आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा