*पुणे, डॉ. संदेश शहा*.
*टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. 9922419159*
जैन दिवाकर श्री चौथमलजी महाराज साहेब यांच्या दिव्य आशीर्वादाने तसेच महासती डॉ.मधुबाला जी महाराज साहेब यांच्या प्रेरणेने कालुखेडा ( जिल्हा रतलाम, मध्यप्रदेश ) येथे उभारण्यात आलेल्या भामाशाह श्री रसिकलालजी माणिकचंदजी धारीवाल जैन दिवाकर कस्तुर भवनचे लोकार्पण बहुश्रुत कवी प्रवर्तक श्री विजय मुनींजी, उपाध्याय डॉ. गौतम मुनी, उपप्रवर्तक श्री चंद्रेश मुनी, एकांत तप आराधक वैभव मुनींजी महाराज साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले तर या भवन चे उद्घाटन पुणे आनंद दरबार चे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी डॉ. गौतम मुनी महाराज साहेब म्हणाले, धर्मस्थळे ही संस्कृतीचे प्रतीक असून ते आत्मचिंतन आणि मनन करण्याचे महत्त्वपूर्ण केंद्र आहे.
मात्र धर्मस्थळांचा उपयोग केवळ धार्मिक कार्यांसाठीच होणे गरजेचे आहे. धर्म प्रभावना करण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या हे स्थानक उभारण्यासाठी धारीवाल परिवाराने अमूल्य योगदान दिले असून त्यांचे चौफेर कार्य कौतुकास्पद आहे.
वैभवमुनीजी महाराज साहेब म्हणाले, आधुनिक सुविधांनी युक्त धर्मस्थळांच्या उभारणीत समाजाचे सहकार्य महत्त्वाचे असते. कालूखेड़ा येथील समाजबांधवांनी तसेच धारिवाल परिवाराने यथाशक्ती कौतुकास्पद योगदान दिले आहे. त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
उपप्रवर्तक चंद्रेशमुनी महाराज म्हणाले, आपल्या आत्मिक उन्नतीसाठी श्रावकांनी धर्मस्थळी जाऊन धर्मआराधना करणे ही काळाची गरज आहे.
यावेळी प्रवर्तक विजयमुनीजी महाराज साहेब यांनी पूज्य गुरुदेव रमेशमुनी महाराज साहेब यांचे स्मरण करत त्यांना लहान गावांमध्ये साधना करणे आवडत असल्याचे सांगितले. त्यामुळे ते गावांमध्ये स्थानक बांधकामावर विशेष भर देत असत. त्यातून धर्मसंस्कार संवर्धित होतात.
यावेळी आनंद दरबाराचे अध्यक्ष बाळासाहेब धोका म्हणाले, रसिकलाल धारीवाल परिवार हा दानशूर परिवार म्हणून ओळखला जातो. या परिवाराने महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात धार्मिक, सामाजिक, आरोग्य, सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. रसिकलालजी धारीवाल यांनी नेहमीच धार्मिक कार्यास सर्वोच्च प्राधान्य देत महत्त्वपूर्ण योगदान दिले असून त्यांचे चिरंजीव प्रकाशशेठ धारीवाल हे पुढे तोच वारसा चालवत आहेत. त्यांच्या अनमोल योगदानामुळे देशभरात अनेक स्थानकांचे काम पूर्ण झाले असून ती धर्मसाधनेची प्रतीक बनली आहेत.
यावेळी महासती डॉ. मधुबालाजी यांच्या पत्राचे वाचन मनोहर मेहता यांनी केले. स्वागतगीत प्रियल भंडारी आणि सरिता भंडारी यांनी सादर केले. पाहुण्यांचे स्वागत संजय कटारिया यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सुभाष टुकडिया यांनी तर विपुल मेहता यांनी आभार मानले.
यावेळी पुणे आनंद दरबार चे अध्यक्ष बाळासाहेब धोखा, अभय चोरडिया, प्रवीण रांका, गणेश ओसवाल, मनसुख लोढा, कालू खेडाचे के. के सिंह, राकेश मेहता, सुजानमल कोचट्टा, जयंतीलाल दख, सुशील चपडोद, चंद्रप्रकाश ओस्तवाल, पुखराज पारख, अजीत छिंगावत, मनीष भटेवरा, श्रीपाल कोचट्टा, बसंतीलाल चपडोद, विनोद लुनिया, पारसमल बर्डिया, संदीप रांका आणि शेखर नहार यांचा सत्कार करण्यात आला.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा