Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २१ मे, २०२६

*रेशन दुकान संदर्भात केलेली तक्रार माघारी घेत नसल्याने केलेल्या ऑट्रॉसिटी गुन्ह्यातुन आरोपीची निर्दोष मुक्तता*.

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


सन 2013 साली केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अन्नसुरक्षा यादीमध्ये धनदांडग्यांची व जवळचे नातलग यांची नावे समाविष्ट केली परंतु आपले नाव सदर यादी मध्ये समाविष्ट केले नसलेने नेरले येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.विजय पन्हाळकर यांनी दि.10/3/2014 रोजी दुकानचे विरोधात तक्रार दाखल केली त्यानंतर परत दि.25/6/2014 रोजी माहिती अधिकार कायद्याच्या अधिकारे अर्ज दाखल करुन दुकानची सर्व माहिती मागणी केली या गोष्टीचा राग मनात धरून गावचे उपसरपंच श्री.ॵदुंबर भोसले -पाटील यांनी दुकानचे तात्कालीन सेल्समन श्री.संतोष कारंडे यांना हाताशी धरुन बनावट स्वरुपाचा खोटा ऑट्रॉसिटी गुन्हा दि.8/8/2014 रोजी दाखल केला त्यावेळी करमाळा पोलिस निरीक्षक श्री.हसबणीस साहेब व डि.वाय एस पी श्री.अनिल पाटील साहेब व गावातील प्रमुख कार्यकर्ते यांनी पन्हाळकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु पन्हाळकर हे तुरुंगात जाईल परंतु तक्रारी अर्ज माघारी न घेण्याच्या निर्णयावर ठाम राहिले.त्यानंतर पन्हाळकर यांना दि.1/9/2014 रोजी मागीतलेल्या माहित्या मिळाल्या.त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार सविस्तरपणे मा.जिल्हा पुरवठा अधिकारी यांचेकडे मुद्देसूद तक्रार दाखल केली त्याची चौकशी होऊन सदरील दुकान दि.20/8/2015 रोजी मा.जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी रद्द केले.


           सदरच्या गुन्ह्यांमध्ये आरोपी विजय पन्हाळकर यांचे वतीने त्यांची मुलगी ॲड.दिपाली पन्हाळकर यांनी काम पाहून घटनेतील नेत्र साक्षीदार श्री.प्रदिप पाटील यांचे केलेल्या उलट तपासणीत सदरचा गुन्हा हा केवळ रेशन दुकान संदर्भात केलेला तक्रारी अर्ज माघारी न घेतल्याने केलेला असून तो निव्वळ खोट्या स्वरुपाचा असलेचे त्यांचे उलट तपासणीत मे.कोर्टाचे निदर्शनास आणून दिले.त्याच प्रमाणे घटनेतील दुसरे साक्षीदार श्री.बिभीषण सुरवसे हे त्यांचे जवळचे नातलग असलेचे मे.कोर्टास सांगितले तसेच पंच श्री.माधवराजे भोसले हे मोठे बंधू असलेचे सांगितले.त्याचप्रमाणे साक्षीदार व पंच हे दोघेही सदर दुकानचे सेल्समन असलेचे मे.कोर्टास सांगितलेने बार्शी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.व्हि.के.मांडे यांनी ॲड.दिपाली पन्हाळकर यांनी केलेले युक्तिवादाचे आधारे आरोपी श्री.विजय पन्हाळकर यांची निर्दोष मुक्तता केली.सदर खटल्यात ॲड.दिपाली पन्हाळकर यांना त्यांचे बारामती येथील गुरू ॲड.अमोल आटोळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा