Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १७ मे, २०२६

*पुणे जिल्हा परिषद अर्थ विभाग आस्थापनेचा गलथान कारभार गोळ्या औषधाअभावी उठला वयोवृद्ध व निराधार पेन्शनर्सच्या जीवावर!*

 *पुणे, डॉ. संदेश शहा*.

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९*



कृषीधवल औद्योगिक विकासाच्या शिखर अवस्थेला पोहोचलेला पुणे जिल्हा आर्थिक संकटात सापडला की काय ? पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग अर्थ अवस्थापनेकडे पेन्शनर्सचे पेन्शन द्यायलाच पैसे शिल्लक नाहीत का ? जिल्हा परिषदवर अशी एवढी कोणती मोठी आफत आलेली आहे की, त्यांच्याकडे पेन्शनरची पेंशन द्यायलाच पैसे शिल्लक नाहीत. नॉन टीचिंग, टीचिंगचे सर्व अधिकाऱ्यांचे पगार झाले. परंतु वयोवृद्ध व निराधार पेन्शनर ची पेन्शन द्यायला जिल्हा परिषदकडे पेन्शन अर्थसहाय्य नाही काय ? शासनाकडून अनुदान आलेले नाही काय किंवा आलेले अनुदान कुठल्या विभागाकडे वळवले गेले याचा खुलासा जिल्हा परिषद ने करावा अशी विचारणा महाराष्ट्र पेंशनर्स असोसिएशनचे राज्य सदस्य व वर्ल्ड कल्चर अँड एनवोर्मेन्ट प्रोटेक्शन कमिशन नवी दिल्लीचे आजीवन सदस्य, साहित्यीक, रामायणाचार्य  डॉ. संजय गिते यांनी प्रशासनास विचारला  आहे. दिनांक १५ मे पर्यंत पेन्शनर लोकांची पेन्शन जमा न केल्याने पुणे जिल्हा परिषद अर्थ विभाग आस्थापनेचा गलथान कारभार उघड झाला असून औषध गोळ्या घेण्यास पैसे नसल्याने जिल्हा परिषद प्रशासन वयोवृद्ध व निराधार पेन्शनर्सच्या जीवावर उठला असल्याची खंत संजय गीते यांनी व्यक्त केली आहे.

 माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांना पुणे जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन कार्यकारिणीने पेन्शन तातडीने विनाविलंब मिळावी यासाठी लेखी  निवेदन दिले आहे. मात्र त्यावर उचित कार्यवाही न झाल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने निवेदनाला केराची टोपली दाखवली आहे की काय ? आजच्या धकाधकीच्या युगामध्ये कोणत्याही खात्यातील पेन्शनर्स असोत किंवा कोणताही साठी ओलांडलेला व्यक्ती असो, त्याला औषध - पाण्याविना जगता येत नाही. औषधे दोन दिवस नसतील तर त्याची विपरीत स्थिती होऊन त्याला दवाखान्यात भरती व्हावे लागते. अशा परिस्थितीत ७० ते ९५,  वर्षे ज्यांची आयुमर्यादा झाली आहे, अशा पेन्शनर्स लोकांनी कोणाकडे हात पसरावेत, मायबाप सरकारच त्यांची दखल घेत नसेल तर कोणाचे हे गण | कोणाचे हे गोतं॥ या उक्तीप्रमाणे या जगात कोण कोणाला पाहत आहे आणि कोण कोणाला जगवतो आहे. आमच्या हक्काची पेन्शनच आम्हाला अद्याप मिळालेली नाही. माहे एप्रिल २०२६ ची पेन्शन दिनांक १७ मे २६ पर्यंत अजून पेन्शनरच्या खात्यावरती जमा झाली नाही. रोज प्रत्येकाला किमान ४०० ते ५०० रुपये  गोळ्या औषधे घेण्यासाठी लागतात. अशा आजारी पेन्शनर्सने व्यक्तींनी कोणाकडे पाहायचे ?  कोणाला औषधे मागायची? स्वतःच्या हक्काची असणारी पेन्शनच जर मिळत नसेल तर या विचित्र परिस्थितीला जबाबदार कोण ? आहे यावर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विचारणा केली असता, तेही मूग गिळून गप्प आहेत. पेन्शनरच्या पेन्शन विषयी ते काहीच बोलत नाहीत, काहीच निर्वाळा देत नाहीत.  याला जबाबदार कोण ? आमचे पेन्शनचे अनुदान गेले कुठे ? यावर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी उत्तर द्यावे ? जर एखादा शिक्षक गोळ्या औषध अभावी मरण पावला तर गेला तर त्याला जबाबदार कोण ? हा सदोष मानवी वधाचा गुन्हा होऊ शकत नाही काय ? असे घडू शकत नाही काय? त्यावेळी संघटना आक्रमक होईल आणि जर संघटना आक्रमक झाली तर याची सगळी फळे आपल्याला भोगावे लागतील ? सदर निवेदनाव्दारे  मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांनी पेन्शनर संघटनेचे लवकरात लवकर पैसे जमा करून वयोवृद्ध आजारी, आजारग्रस्त पेन्शनर्स यांना जीवदान द्यावे अशी विनंती निवेदना मधून करण्यात आली आहे.  मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पेन्शनर लोकांचा विचार करून तात्काळ पेन्शन जमा करण्याचे आदेश द्यावेत अशी आग्रही मागणी डॉ . संजय गीते व पेन्शनर कार्यकारिणीने केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा