Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १५ जून, २०२६

म्हसवडच्या सिद्धनाथाच्या दर्शनावरून परतताना भाविकांवर काळाचा घाला* विहिरीत पिकअप विहीरीत कोसळून रांजणीतील ८ भाविकांचा करुण अंत ! माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथील हृदयद्रावक दुर्घटना. मृतांमध्ये ७ महिला आणि १ चिमुरडीचा समावेश

 *अकलूज --प्रतिनिधी* 

*केदार लोहकरे* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी*



भक्तीचा आनंद घेऊन गावाकडे परतणाऱ्या भाविकांवर वाटेतच काळाने घाला घातला.सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात तांदुळवाडी येथे एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला आहे.म्हसवड येथील श्री सिद्धनाथाचे दर्शन घेऊन पंढरपूरकडे परतणाऱ्या भाविकांचे पिकअप वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत कोसळले. या भयानक दुर्घटनेत पिकअपमधील १४ पैकी ८ जणांचा पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाला.मृतांमध्ये ७ महिला आणि एका लहान मुलीचा समावेश असल्याने संपूर्ण परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.हे सर्व मृत भाविक पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी आहेत.



*देवदर्शनाचा प्रवास अखेरचा ठरला !*

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील भाविक म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी पिकअप वाहनाने गेले होते.दर्शन घेऊन आनंदाने गावाकडे परतत असताना.माळशिरस-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावानजीक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अनपेक्षितपणे हे पिकअप वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या विहिरीत थेट कोसळले.


*चौकट*

*सुरक्षा कठड्यांचा अभाव ठरला जीवघेणा!*

तांदुळवाडी येथील ही विहीर रस्त्याला लागूनच आहे आणि सध्या ती पाण्याने तुडुंब भरलेली होती. सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे या विहिरीला कोणतेही सुरक्षा कठडे (संरक्षक भिंत) नाह आहे.चालकाचे नियंत्रण सुटताच पिकअप थेट विहिरीच्या खोल पाण्यात तळाशी गेली.ज्यामुळे भाविकांना वाहनातून बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी या ठिकाणी कधीही अपघात झाला नव्हता,हा पहिलाच पण अत्यंत भीषण अपघात आहे.


*स्थानिकांची धाव आणि युद्धपातळीवर मदतकार्य**

अपघात झाल्याचे समजताच तांदुळवाडी येथील स्थानिक नागरिकांनी तातडीने घटना स्थळाकडे धाव घेतली आणि प्रशासनाची वाट न पाहता मदतकार्य सुरू केले.घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, अग्नशामक दल,प्रांताधिकारी आणि जिल्हा प्रशासनाची टीम घटनास्थळी दाखल झाली.

पाण्याने भरलेल्या विहिरीतून सुरुवातीला क्रेनच्या साहाय्याने पिकअप जीप बाहेर काढण्यात आली.त्यानंतर स्थानिक तरुण आणि बचाव पथकाने विहिरीत उतरून शोध मोहीम राबवली.या शोध मोहिमेत विहिरीतून ८ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले तर सुदैवाने या दुर्घटनेतून ६ जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे.


*रांजणी गावावर दुःखाचा डोंगर, सोलापूर जिल्हा शोकाकुल**

एकाच गावातील ८ जणांचा, त्यातही ७ महिला आणि एका चिमुरडीचा अशा क्रूरपणे अंत झाल्याचे समजताच रांजणी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.गावातील घराघरांमध्ये आक्रोश सुरू असून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.पोलीस प्रशासनाकडून अपघाताच्या कारणाचा अधिक तपास सुरू आहे.


या अपघात मृत्यू पावलेली नावे इंदुबाई दशरथ बावचे (वय ६०),अमोल सातोरे (वय २३),पूजा बालाजी बावचे (वय २७),अश्विनी संदीप बावचे (वय २७),संस्कार संदीप बावचे (वय १५),संस्कृती संदीप बावचे (वय १४),आरव अमोल खातोरे (वय ८),समर्थ बालाजी बावचे (वय ६ महिने) या आठ जणांचा मृत्यू झाला तर सिध्देश्वर पोपट जाधव,सागर चौगुले,अपूर्व अमोल सातोरे,आरव अमोल सातोरे,शशिकला पोपट जाधव,बालाजी बावचे,संदीप बावचे,ताई बावचे,पूजा बालाजी बावचे,सार्थक संदीप बावचे,गणेश संदीप बावचे,बालाजी बावचे यांचा लहान मुले लहान मुले जखमी झाले आहेत.त्यांचावर पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा