इंदापूर, डॉ. संदेश शहा.
सोमवार, २९ जून २६
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
वटपौर्णिमेच्या पावन पर्वा निमित्त वृक्ष संजीवनी परिवार आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शहर योग वर्गातील महिला
साधकांना वडाच्या रोपांचे वाटप करण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातून पर्यावरण रक्षणाचा तसेच देशी आयुर्वेदिक गुणधर्म असलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्याचा
संदेश देण्यात आला.
इंदापूर नगरपरिषदे शेजारील जिल्हा परिषद शाळा पटांगणात झालेल्या या
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वडाच्या वृक्षाचे धार्मिक, औषधी, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्व विषद करण्यात आले. भारतीय संस्कृतीत वड हा केवळ धार्मिक वृक्ष नसून तो स्थैर्य, सामर्थ्य आणि दीर्घायुष्याचे प्रतीक मानला जातो. वड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष असून, भरपूर प्राणवायू देणारा हा वृक्ष पर्यावरण समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. भविष्यातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वडाची लागवड आणि संवर्धन ही काळाची गरज असल्याचे मत प्रशांत गिड्डे यांनी व्यक्त केले.
वटपौर्णिमेच्या दिवशी महिला वडाच्या वृक्षाची पूजा करून आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. या परंपरेला आधुनिकतेची जोड देत, वृक्ष संजीवनी परिवाराच्या अध्यक्षा सायरा आत्तार यांच्या संकल्पनेतून वडाचे झाडांचे वृक्षारोपण ही अभिनव संकल्पना राबविण्यात आली. यावेळी उपस्थित प्रत्येक महिलेने किमान एक वडाचे रोप लावून
त्याचे संगोपन करण्याचा संकल्प महिला साधकांनी यावेळी केला.
या उपक्रमात सायरा आत्तार, रश्मीताई निलाखे, मल्हारी घाडगे, हमीद आत्तार, अशोक अनपट, चंद्रकांत देवकर, सचिन पवार, महादेव सोमवंशी आणि कुशल कोकाटे यांनी महिलांना रोपांचे वाटप केले. या अनोख्या उपक्रमास योगवर्गातील महिला साधिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा