Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २८ जून, २०२६

भिगवण पोलिसांची बेधडक कारवाई करमाळा तालुक्यातील शेतीच्या विद्युत मोटार मधील केबल चोरणारी परप्रांतीय टोळी भिगवण पोलिसांनी पकडली सहा लाख तेहतीस हजार रुपयाचा मुद्देमाल भिगवण पोलिसांकडून जप्त

 *करमाळा प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

 *मो;-9850686360*


केबल चोरी मधील जे आरोपी करमाळा पोलिसांना पकडायचे होते ते आरोपी पुणे जिल्ह्यातील भिगवन पोलिसांनी पकडले आहे करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील वाशिंबे परिसरात गेली महिनाभरापासून केबल चोर धारकांनी उजनी पट्ट्यातील शेतकऱ्यांना अक्षरशः सळो की पळो करून सोडले होते बागायती पट्ट्यातील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटरीच्या केबल अक्षरशः गायब होत होत्या याबाबत शेतकऱ्यांनी करमाळा पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे फिर्याद देणेदेखील अक्षरशा टाळले होते अखेर भिगवण पोलिसांनी करमाळा परिसरातील केबल चोर चोरी करणारे परप्रांतीय टोळी पकडली आहे म्हणजेच करमाळा पोलिसाच्या नाकावर टिचून भिगवण पोलिसांनी सदरची मोठी कारवाई केली आहे याबद्दल भिगवण पोलिसांचे वाशिंबे सोगाव परिसरातील शेतकऱ्यांमधून विशेष अभिनंदन होत आहे 

करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील सोगाव, वाशिंबे, पारेवाडी, जिंती केतुर  आदी भागात शेतकऱ्यांच्या शेतामधील विद्युत मोटारी मधील केबल वायर चोरणारी परप्रांतीय टोळी आज भिगवण येथील पोलिसांनी मोठ्या सीताफिने पकडले आहे यामध्ये करमाळा तालुक्यातील एका युवकाचा समावेश असून परराज्यातील चार आरोपीचा यामध्ये समावेश आहे

सदरच्या कारवाईत 6 लाख 33 हजार 650 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सोमनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली डिकसळ परिसरात नाकाबंदी सुरू असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार भिगवण बायपास रोडवर संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली.  

यावेळी संशयास्पद चारचाकी वाहन ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यामधील चार जणांना अटक करण्यात आली. आरोपींकडून विविध ठिकाणांहून चोरी करण्यात आलेल्या केबलच्या गुंडाळ्या तसेच वाहन जप्त करण्यात आले. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये सुमारे 182 मीटर केबल, चारचाकी वाहन तसेच इतर साहित्याचा समावेश असून त्याची एकूण किंमत 6 लाख 33 हजार 650 रुपये इतकी आहे. यावेळी एक मुळचा करमाळा तालुक्यातील तसेच इतर चार परप्रांतीयांना भिगवण पोलिसांनी पकडले आहे 

मागील काही दिवसापासून करमाळा तालुक्यातील वाशिंबे परिसरात केबल चोरानी अक्षरशः थैमान घातला होता यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या केबलची चोरी झाली होती याबाबत अनेक वेळा शेतकऱ्यांनी करमाळा पोलीस स्टेशन येथे फिर्याद नोंदवली होती मात्र करमाळा पोलिसांनी याचा काहीही तपास न करता उलट पणे भिगवण पोलिसांनी मोठ्या धाडसाने केबल चोरांना पकडले आहे जे काम करमाळा पोलीस स्टेशन ने करावयाचे होते ते धाडसाचे काम भिगवण पोलीस स्टेशन ने केले आहे केबल चोर धारकांना वेळीच पकडल्याने त्यांच्याकडून अनेक लाखो रुपयांचे मुद्देमाल सापडण्याची शक्यता आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा