Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १२ जुलै, २०२६

*एस टी बस बंद पडू नये म्हणून शाळकरी मुलींनी काढली बस ची नजर.. नवनियुक्त आगार व्यवस्थापक शिंदे यांच्यापुढे एक आव्हान*

 *करमाळा तालुका -प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

 *मो;-9850686360*


करमाळा तालुक्यातील एस टी बस जागोजागी बंदच पडत असतात म्हणून शाळकरी  मुलींनी चक्क एसटी बसचीच  नजर काढली.
  कर्जत करमाळा मार्गांवरील बस नेहमीच बंद पडत असतात. आठवड्यातून किमान तीन दिवस बस बंद पडतातच किंवा बेटाईम येतच असतात.आज तर सकाळी पहिली बसच रावगाव येथे बंद पडली. सततच्या एसटी च्या गलथान कारभाराला कंटाळून चक्क शाळकरी मुलींनी एसटी बसचीच नजर काढली. मुलींनी लिंबू मीरची लिंभाचा ढगळा लावून नजर काढली. 
करमाळा ते कर्जत या ठिकाणावरून मोट्या प्रमाणावर विद्यार्थी शिक्षणासाठी कर्जत या ठिकाणी जातं असतात. परंतु करमाळा आगारच्या नाकर्तेपणामुळे  शाळेची वेळ 10 ची असताना मुलांना सकाळी 7 वाजताच बसस्टॅडवर यावे लागते.  बसची नजर काढल्यामुळे तरी आजपासून बस बंद पडणार नाहीत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस आमच्या प्रश्नाला  गांभीर्याने घेतील अशी अपेक्षा 10 वी ची विदयार्थिनी प्रतिष्ठा शिंदे हिने अपेक्षा व्यक्त केली.            




                        अकलूज. आगारामध्ये उल्लेखनीय कार्य करून स्व. बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान स्पर्धेत 250 आगारामधून अकलूज आगाराला पहिल्या वर्षी पाच लाखाची बक्षीस मिळाले तर दुसऱ्या वर्षी तीन लाखाची बक्षीस मिळवून देणारे  आगार व्यवस्थापक शिंदे साहेब यांची आता करमाळा आगारात बदली झाली असून त्यांनीही अकलूज आगारा  प्रमाणे करमाळा आगारात प्रशासकीय कौशल्याने आपल्या कामाचा ठसा उमटवावा करमाळा आगाराची  अकलूज प्रमाणे उंचीवर नेहावे अशी अपेक्षा प्रवाशांमधून व्यक्त होत आहे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा