*करमाळा तालुका -प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो;-9850686360*
करमाळा तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना तसेच जेष्ठ नागरिक व महिला भगिनींना दळणवळणाची सोय अधिक चांगली होण्यासाठी आपण परिवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांचेकडे एकुण वीस नवीन एस टी गाड्यांची मागणी केली होती. आपल्या या मागणीस आता यश आले असून पहिल्या टप्यात करमाळा आगाराला उद्या पाच नवीन बस उपलब्ध होणार आहेत पुढील दोन दिवसात कुर्डुवाडी आगारासाठीही पाच नवीन बस उपलब्ध होतील अशी माहिती आमदार नारायण आबा पाटील यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना आमदार पाटील यांनी सांगितले की करमाळा तालुक्यातील दळणवळण व्यवस्था अधिक सुलभ करण्यासाठी आपण आमदार पदाची सूत्रे हातात घेतल्या पासुन प्रयत्नशील आहे. आपण आयोजित केलेल्या आमसभेत अनेक नागरिकांनी आमच्या गावात एस टी बस येत नाही अशी तक्रार केल्यानंतर तातडीने आपण पाठपुरावा करुन यापुर्वीही तब्बल वीस नवीन एस टी गाड्या मतदार संघासाठी मिळवून दिल्या. परंतु यावर समाधान न मानता आपण याबाबत अधिक पाठपुरावा करुन आणखी नवीन वीस बसेस मंजूर करुन घेत्या आहेत. पहिल्या टप्प्यात दहा तर आणखी पंधरा दिवसांनी दहा अशा वीस गाड्या मतदार संघात येणार आहेत. यामुळे करमाळा आगारास नवीन दहा तर कुर्डुवाडी आगाराला दहा अशा वीस गाड्या मिळतील. याबाबत परिवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आपण मतदार संघातील नागरिकांच्या वतीने आभारी असुन पुढील काळात इलेकट्रिक गाड्या मिळवण्यासाठी आपम प्रयत्न करणार आहोत.तसेच करमाळा येथुन राज्यातील महत्त्वाच्या शहरात जाता यावे यासाठी लांब पल्ल्याच्या गाड्या देखील सुरू करणार आहोत. मध्यंतरी गाड्यांची संख्या अपुरी असल्याने अनेक गाड्या बंद झाल्या होत्या. करमाळा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना हक्काच्या लाल परिमधून प्रवास करता यावा यासाठी आपण सतत दक्ष राहुन पाठपुरावा करत असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा