*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-973086744
आषाढी वारीच्या पार्श्वभुमीवर परराज्यातील अवैध मद्याची महाराष्ट्र राज्यात चोरट्या मार्गाने वाहतुक करताना निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग माळशिरस विभाग व भरारी पथक क्र.२ यांच्या पथकाची महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या विदेशी मध्य वाहतुकीवर दमदार धडक आणि मोठी कारवाई करण्यात आले असून त्यामुळे माळशिरस तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे
दि. १२.०७.२०२६ रोजी मा.डॉ. राजेश देशमूख सो. आयुक्त राज्य उत्पादन महाराष्ट्र राज्य मुंबई मा.श्री. प्रसाद सुर्वे सह. आयुक्त अंमलबजावणी व दक्षता राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई व श्री. सागर धोमकर सो. विभागीय उपआयुक्त पुणे विभाग पुणे, मा. श्रीमती भाग्यश्री जाधव, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर श्री. सौरभ अदाटे उपअधीक्षक सोलापूर, तसेच श्री. सचिन भवड निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, माळशिरस विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहिती वरून रविवारी दुपारच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षक सचिन भवड व दुय्यम निरीक्षक माळशिरस क्र. २ सौरभ भोसले यांनी त्यांच्या संपुर्ण स्टाफसह मळोली ता. माळशिरस जि. सोलापूर येथे सापळा रचुन गोवा राज्य निर्मीत व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेले विदेशी मद्य ट्रकमधुन वाहतूक करताना मिळून आल्याने दोन आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात गोवा राज्य निर्मीत व महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंध असलेले विदेशी मद्याचे ७५० मिली क्षमतेच्या ८४०० बाटल्या (७०० बॉक्स) एकून रक्कम रु. ९२,४०,०००/- व एक चौदा टायर ट्रक त्याची अं. किंमत रु. ३२,००,०००/- व तीन वापरते मोबाईल अं. किंमत ३१,०००/- असा एकून १,२४,७१,०००/- रु. किमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अन्वये दोन इसमांवरती गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई निरीक्षक सचिन भवड, राकेश पवार दुय्यम निरीक्षक सौरभ भोसले, बाळासाहेब नेवसे, अमित नांगरे, अक्षय सस्ते, स्वप्नील सोनवलकर, प्रितम पडवळ, सहा.दु.निरी. एस.ए. बिराजदार, जवान योगेश पाटील, प्रविण पुसावळे, देवीदास चौधरी, संजय पराडे, रेवनसिद्ध कांबळे, योगीराज तोग्गी, युवराज टेळे, आबासो कसबे, सचिन भोसले, किरण गोळे, रोहित लोखंडे, सुजित जाधव, दिवेश फडतरे, सौरभ गुरव, ओंकार जाधव, महिला जवान कल्पना जाधव जवान नि. वाहन चालक मारुती जडगे यांनी पार पाडली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री. सौरभ भोसले दुय्यम निरीक्षक हे करत आहेत.
तरी जनतेस आवाहन करण्यात येते की, अवैध मद्य निर्मीती, विक्री, वाहतुक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास या विभागाच्या टोल फ्री क्र.१८००८३३३३३३व व्हॉटस अॅप क्र. ८४२२००११३३ यावर संपर्क साधावा असे आवाहन. श्रीमतीभाग्यश्री जाधव अधीक्षक सो राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर यांनी केले आहे







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा