Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १२ जुलै, २०२६

मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या कुगाव ते इंदापूर जोडपुलाचे काम वेगात चालू....!

 *करमाळा तालुका -प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

 *मो;-9850686360*


तिनही बाजूने ३० किलोमीटर  पाण्याने वेढलेल्या कुगाव गावच्या दळणवळणाचा प्रश्न आमच्यासमोर होता. या गावातुन प्रवाशी वाहतूक पाण्यामार्गेच होते. कुगावला चार जलमार्ग मंजूर आहेत परंतु जलमार्गातील धोके लक्षात घेता कोकरे यांनी प्रथम पुलाची मागणी केली. कुगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामसभेत जोडपुलाचा ठराव मंजूर करुन शासन दरबारी कागदोपत्री पाठपुरावा चालु केला.


     कुगाव ता करमाळा ते इंदापूर जोडपूलाचा विषय मार्गी लावण्यासंदर्भात सौ तेजस्विनी दयानंद कोकरे सरपंच ग्रामपंचायत कुगाव पदी कार्यरत असताना पासूनच्या सातत्यपूर्ण केलेल्या सकारात्मक प्रयत्नास इंदापूर शहरातील व्यापाऱ्यांची साथ अन् सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री तथा इंदापूर चे कर्तव्यदक्ष आमदार मा ना दत्तात्रय मामा भरणे कृषीमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा भक्कम पाठिंबा यातून स्वर्गीय मा ना अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे सहकार्य मिळाले.


    कुगाव ते इंदापूर जोडपुलाला स्वर्गीय मा ना अजितदादा पवार साहेब यांनी २९ फेब्रुवारी २०२४ मध्ये विधानसभेत ₹ ३९६ कोटी+ ला मंजुरी देऊन २३ ऑगस्ट २०२४ रोजी भुमीपूजन केले. मे T & T infra Ltd Pune च्या माध्यमातून पुलाचे काम प्रचंड वेगाने चालु आहे. सदर कुगाव ते इंदापूर जोडपुलामुळे पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा अन् पालखी महामार्ग इंदापूर शहरात जोडला जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा