Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १२ जुलै, २०२६

गाव तिथे उद्योजक मेळावा करमाळ्यात घेणार उद्योग मंत्री उदय सामंत

 *करमाळा तालुका -प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

 *मो;-9850686360*


करमाळा शहर लगतच्या 48 हेक्टर क्षेत्रातील भूखंडामध्ये केंद्र सरकारच्या कांदा प्रक्रिया प्रकल्पासाठी 50 एकराचा भूखंड उपलब्ध करून देणार असून 

 गाव तिथे उद्योजक मेळावा घेऊन उद्योजकांना प्लॉट कर्ज देण्यासाठी मार्गदर्शन शिबिर घेण्यात येईल असे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिल

 शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी 

 उद्योग मंत्री सावंत यांची भेट घेऊन करमाळा एमआयडीसी डेव्हलप करण्यासाठी पर्याय सुचवले 

 केंद्र सरकारच्या नवीन कांद्या प्रक्रिया प्रकल्पासाठी 50 एकर क्षेत्र नाफेडला उपलब्ध करून द्यावे त्यामुळे या माध्यमातून शहर व तालुक्यातील किमान दोन ते तीन हजार लोकांना रोजगार मिळेल व शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळेल 

 तसेच नवीन झालेले विहिरीतून तात्काळ पाणी कनेक्शन उद्योजकांना जोडून द्यावेत 

 उरलेले प्लॉट वितरित करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू करावी 

 अद्यापही त्या भागात असलेली छोटी छोटी प्लॉट वाटप केले जात नाहीत अधिकारी त्रुटी काढून प्रकरण परत पाठवतात तसेच प्लॉट घेतलेल्या उद्योजकांना अद्याप कर्ज उपलब्ध सीबीडी बँक करत नाही या समस्या मांडल्या 

 यावर नामदार उदय सामंत यांनी मी स्वतः करमाळ्यात येऊन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मुंबई व उद्योग मंत्रालय यांच्या वतीने करमाळा येथे गाव तिथे उद्योजक मेळावा घेऊन सर्व प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले 

  शिवसेना वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख अण्णासाहेब घाडगे (झरे )तालुकाप्रमुख बाळासाहेब वाघ कॉन्ट्रॅक्टर वीट दूध संघाचे संचालक व उप तालुकाप्रमुख प्रशांत राजे भोसले 

 वैद्यकीय मुदत कक्ष प्रमुख दीपक पाटणे आधी जण उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा