Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १२ जुलै, २०२६

औद्योगिक कंपन्याच्या थकीत कर चुकवेगिरी विरुद्ध जप्तीची कारवाई करा अन्यथा आंदोलन : माजी सैनिक सावंत शिवाजी रामकृष्ण

 *मुख्य संपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448*



तुळजापूर तालुक्यातील मौजे तामलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील बहुचर्चित औद्योगिक वसाहतीचा थकीत कर वसुलीसाठी माजी सैनिक तथा संस्थापक अध्यक्ष तसेच भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते सावंत शिवाजी रामकृष्ण यांनी भांडवली मूल्यावर आधारित औद्योगिक थकीत कर वसुलीसाठी मागील ०३ (तीन) वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून संविधानिक मार्गानी प्रशासनाच्या विरोधात लढा उभा केला होता.              


       त्यास प्रशासनाने दिनांक २० मे २०२६ रोजी जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या महसूल विभागामार्फत कर वसुली करिता कारवाई करण्याकरिता तहसीलदार तुळजापूर यांना आदेशित केलेले असतानाही तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूर यांच्याकडे प्रशासकीय सुनावणी संपून त्यांच्याकडे प्रशासकीय अपिलाचे मुदत संपलेले असतानाही.                                                      



 तहसीलदार तुळजापूर व गटविकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९/ १९६० च्या कलम १२९, महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ प्रकरण ८, व इतर सर्व महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय आदेशाप्रमाणे तामलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील मागील (०३) तीन वर्षाच्या किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा कर थकबाकीदार औद्योगिक कंपनीकडून कर वसुलीकरता जप्ती करण्यास तहसीलदार तुळजापूर व गटविकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूर अधिकारी वारंवार का चालढकल करत असल्यामुळे


 प्रशासनाच्या कामावर तामलवाडी परिसरातील जनता शंका व्यक्त करून  प्रशासकीय कामात भ्रष्टाचार करण्यासाठी अधिकारी औद्योगिक कंपन्यांना का पाठबळ देत आहेत ?  का त्यामध्ये व्यक्तिगत तडजोड तर केली जात नाही ना ? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत; यातच तुळजापूर विधानसभेचे आमदार राणाजगजीत सिंह यांना संस्थेच्या वतीने दिनांक १८ मे २०२६ रोजी ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याकरिता प्रशासनास सक्तीने विषय हाताळण्यास विनंती करून प्रशासनातील गटविकास अधिकारी यांना लोकप्रतिनिधी या नात्याने वसुलीच्या सूचना देऊनही पालत्या घड्यावर पाणी का पडत आहे यावर सर्वसामान्य तामलवाडी परिसरातील जनता व राजकीय विश्लेषक ही लोकप्रतिनिधीच्या भूमीकेवरही शंका उपस्थित करत असल्यामुळे श्री सावंत यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यासच न्याय मिळत नसल्याबाबत भाजपा धाराशिव जिल्हाध्यक्ष श्री दत्ता (भाऊ) कुलकर्णी व ग्रामीण तालुकाध्यक्ष श्री महादेव जाधव यांना सदरीलबाब लेखी स्वरूपात देऊन न्याय मागितला आहे व २१ जुलै २०२६ पर्यंत थकीत कर असलेल्या औद्योगिक कंपन्यावर सक्तीची कारवाई नाही झाल्यास दिनांक २१ जुलै २०२६ पासून पंचायत समिती तुळजापूर समोर सकाळी १०:०० वाजल्यापासून उपोषण सुरू करणार असल्याबाबत माजी सैनिक श्री सावंत शिवाजी यांनी सविस्तर चर्चा करून एका लेखी निवेदनाद्वारे धाराशिव चे निवासी जिल्हाधिकारी श्री विद्याचरण चंद्रकला जगन्नाथ कडवकर यांना व त्यांच्यामार्फत मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, आयुक्त छत्रपती संभाजीनगर, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव, तहसीलदार तुळजापूर, गटविकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूर यांना ही कळवले आहे


 याविषयाबाबत तामलवाडी ग्रामस्थ व भाजपा कार्यकर्ते  लक्ष देऊन बसले आहेत की, पक्ष सत्तेत असताना प्रशासनाकडून सक्रिय कार्यकर्त्यास न्याय मिळवून देतो की नाही, मग न्याय मिळत नसेल तर भा ज पा पक्षावर व लोकप्रतिनिधीवर सर्वसामान्य जनतेने विश्वास कितपत ठेवणे योग्य आहे ?  याबाबत तामलवाडी ग्रामपंचायत निवडणुकीतून उत्तर मिळणार आहे अशी दबक्या आवाजात भा ज पा च्याच एका गटात चर्चा चालू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा