*अकलूज-- प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
अकलूज येथील रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयात वस्त्रशास्त्र व फॅशन डिझाईन या विभागा अंतर्गत आषाढी एकादशी निमित्त “विठ्ठल रुक्मिणी” ची प्रतिमा फॅब्रिक पेंटिंग द्वारे पारंपारिक नारायण पेठ या साडीवर काढण्यात आली.हे पेंटिंग महाविद्यालयामध्ये द्वितीय वर्षात शिकत असणाऱ्या कु.प्राजक्ता दिनकर बोडरे या विद्यार्थिनीने साकारली आहे.
वस्त्रशास्त्र व फॅशन डिझाईन विभागातर्फे विद्यार्थिनींना या क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, वस्त्रनिर्माण आणि फॅशन ड्रेसचे सखोल ज्ञान मिळावे या उद्देशाने वर्षभर विविध शैक्षणिक व अभ्यासेतर उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.विद्यार्थिनींना नैसर्गिक रंग तयार करण्याचे तसेच बांधणीचे प्रशिक्षण दिले जाते.विद्यार्थिंनीकरिता विविध गारमेंट कन्स्ट्रक्शन आणि पॅटर्न मेकिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते.विविध ॲक्सेसरीज,ज्वेलरी मेकिंग, अशा कौशल्य निर्माण करणाऱ्या कलांशी संबंधित कार्यशाळा आयोजित महाविद्यालयात केले जात असतात.विद्यार्थिनींनी उद्योजकीय कौशल्य आत्मसात करण्याच्या दृष्टीने राखी मेकिंग, कॅलेंडर मेकिंग,विविध ॲक्सेसरीज मेकिंग इत्यादींसाठी प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. विद्यार्थिनींना वस्त्रशास्त्र विषयातील औद्योगिक प्रशिक्षणासाठी स्थळ भेटींचे आयोजन करण्यात येत असते. विविध प्रांतातील पेंटिंग जसे की, वारली पेंटिंग,मधुबनी,कलमकारी इत्यादीचे देखील प्रशिक्षण दिले जाते.
विद्यार्थीनींच्या अंगातील विविध कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालयाच्या विकास समितीच्या सभापती कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील व इतर संचालक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभते. विद्यार्थीनीचे पालक दिनकर बोडरे यांनीही मार्गदर्शन केले.टेक्सटाइल सायन्स व फॅशन डिझायनिंग विभागाच्या विभाग प्रमुख डॅा.राजश्री निंभोरकर यांनी विद्यार्थिनींना सदर प्रशिक्षण दिले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा. अमित घाडगे यांनी विद्यार्थीनींचे अभिनंदन केले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा