इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी
सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९
महाराष्ट्र पेन्शन असोसिएशन पुणे ची 69 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक 12 रोजी संपन्न झाली. सदर सभेस महाराष्ट्र राज्यातून सर्व तालुका, जिल्हा अध्यक्षासह सभासदांनी उत्साहामध्ये हजेरी लावली. उद्यान मंगल कार्यालय सदाशिव पेठ पुणे येथे आयोजन करण्यात आले होते. प्रथम गणेश पूजन प्रमुख पाहुणे श्री. देवराम शेळ के, अध्यक्ष मा. श्री मारणे साहेब, कार्याध्यक्ष श्री. वाबळे साहेब, श्री रवींद्र धोंगडे साहेब, श्री लंके गुरुजी, श्री रोकडे साहेब, सरचिटणीस श्री सुभाष पवार साहेब, अहिल्यानगर अध्यक्ष श्री मा. द. मा. ठुबे, श्री वसंतराव सबनिस या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नंतर सभेत सुरुवात करण्यात आली. या अहवालवर्षात माननीय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार, मा. स्वर्गीय अनंतराव थोपटे
तसेच सर्व स्वर्गीय ज्ञात अज्ञात सभासद बंधू, यांना भ.
श्रद्धांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनचे सरचिटणीस श्री सुभाष पवार यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली . मागील वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 18-9-2025 चे वृत्त वाचून मंजूर केले. सन 2025-26 च्या आर्थिक पत्रकारवर चर्चा करण्यात आली व मंजुरी दिली .. तसेच 2025-26 चे लेखापरीक्षण वाचन करून मंजूर केले. दोष दुरुस्ती अहवाल वाचून या विषयाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. तसेच 2026-27 या वर्षांमध्ये संस्थेसाठी लागणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक यावर सर्व सभासदांनी सखोल चर्चा करून त्याला मंजुरी दिली. विषय पत्रिकेतील अनुक्र. १ ते ११ सर्व विषयांवर सखोल चर्चा करून मंजुरी देण्यात आली .
सेवानिवृत्त समाचार मासिका बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली कालाच्या ओघात त्याला लागणारा खर्च व वितरण खर्च यावर मत व्यक्त करण्यात आले व बिगर खर्ची ऑनलाइन प्रत सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण करण्याचे ठरवले. त्याचप्रमाणे २० २५ - २६ सेवानिवृत्त पुरस्काराचे महाराष्ट्र राज्यातील स्थळ ठरवण्यात आले . माननीय अध्यक्ष यांच्या पूर्व परवानगीने ऐन वेळच्या विषयावर चर्चा व निर्णय झाला. यात महाराष्ट्र राज्य असोसिएशनचे सभासद व अहिल्यानगर मधील जामखेड
तालुका पेश्नर्स संघाचे अध्यक्ष श्री डॉक्टर संजय सिता 4396 गीते यांना प्रसिद्धी प्रमुख ४म्हणुन निवड करण्यात आली . अध्यक्षांचे मनोगत व्यक्त होऊन आभार प्रदर्शन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून सहसंचालक कोषागार पुणे कार्यालय मा. देवराम शेळके होते. त्यांनी पेन्शन संदर्भामध्ये येणाऱ्या समस्या व अडचणी या व्यक्त केल्या व यापुढे पेन्शनच्या बाबतीमध्ये प्राधान्यने नेहमी लक्ष देऊन त्या समस्ये तात्काळ मार्गी लावीन. असा विश्वास व्यक्त केला. तसेच मा. श्री सचिन रोकडे असिस्टंट कोषागार कार्यालय यांनी महाउपलब्धी अॅप वरती मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे श्री धोंगडे रवींद्र यांनी मार्गदर्शन केले
म. पे. अ. चे अध्यक्ष मा. श्री एन. डी. मारणे. यांनी आपल्या भाषणामध्ये राज्यातील सर्व सेवानिवृत्तांचे आभार व्यक्त केले की, सलग तीन कार्यकारीणीमध्ये आपण सर्वांनी माझ्यावर अतूट विश्वास टाकून अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली व ती जबाबदारी मी माझ्या परीने सर्वांच्या सहकार्याने पार पाडली. पाडत आहे व यापुढेही पार पडून आपली सर्वांची सेवा करण्याची संधी आपण मला दिली. त्याबद्दल कार्यकारी मंडळ व सर्व जिल्हा सलग्न संस्थेचे आभार मानतो . तमाम राज्यातील सेवानिवृत्तांचे प्रलंबित प्रश्न
सोडवण्यासाठी मध्यवर्ती इमारतीतील सर्व विभागाशी सातत्याने संपर्क ठेवून शासन पातळीवर, सचिव यांच्याशी संपर्क, पत्र व्यवहार करून प्रश्न सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. प्रयत्न चालू आहेत. पदवीधर मधून पदोन्नतीने केंद्रप्रमुख मुख्याध्यापक झालेल्यांना पूर्वलक्षी प्रभावाने एक आगावू वेतन वाढ मिळावी यासाठी संस्थेमार्फत केंद्रप्रमुख/मुख्याध्यापक यांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 2018 पूर्वी . सेवानिवृत्त झालेल्या निवृत्त वेतनधारकांची MSCIT ची कपात झालेली रक्कम सेवानिवृत्तना परत मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा चालू आहे. काही जिल्ह्यात मिळाली आहे. एक जुलैची काल्पनिक वेतन वाढ मिळावी यासाठी शासन स्तरावर पत्रव्यवहार चालू आहेत. तसेच महाराष्ट्रातील बरेचशे जिल्हे खंडपीठामध्ये गेले. त्यांना न्यायालयाने दिलासा दिलेला आहे. सेवानिवृत्तासारखा निकाल दिल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. यासाठी त्या जिल्ह्यांचे अभिनंदन केले. १ जुलैची वेतन वाढ सर्वांनाच मिळावी यासाठी मा . मुख्यमंत्री मा. उपमुख्यमंत्री संबंधित विभागाचे सचिव व आयुक्त, संचालक यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे . पाठपुरावा चालू असल्याचे सांगण्यात आले . 2026 - 27 चा जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट
मोठ्या उत्साहात पार पाडत आहोत. 5/2/2027 रोज या ठिकाणी हा महाराष्ट्र पे. असोसिएशनचा मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होईल असे जाहीर करण्यात आले.
पुणे जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन अध्यक्ष श्री संपतराव तनपुरे, सरचिटणीस सुदामराव भापकर, तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्षांचा सन्मान केला. सर्व तालुकाध्यक्षांनी या महिन्यांमध्ये राज्यसंघाचे दीड हजार सभासद, अवघ्या दीड महिन्यामध्ये केले आहेत. हा सन्मान आमचा नसून तमाम सेवानिवृत्ती शिक्षक बांधवांचा आहे . केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक विस्तार अधिकारी यांचा आहे. अशी भावना पुणे जिल्हा अध्यक्ष श्री तनपुरे संपतराव यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनच्या आजच्या सभेचे अध्यक्षपद श्री एन. डी. मारणे यांना देण्यात आले . प्रस्ताविक कार्याध्यक्ष श्री वसंतराव वाबळे यांनी केले. अनुमोदन श्री संपतराव तनपुरे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुभाष पवार, सरचिटणीस यांनी केले व आभार श्री. भास्कर लोंढे यांनी मानले. शेवटी गोड जेवणाचा आनंद घेत सर्वजणांनी
महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन पुणेच्या कार्याचा गौरव केला .
गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन पुणे यांची 69 वी सर्वसाधारण सभा उद्यान मंगल कार्यालय सदाशिव पेठ पुणे येथे संपन्न
महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन पुणे यांची 69 वी सर्वसाधारण सभा उद्यान मंगल कार्यालय सदाशिव पेठ पुणे येथे संपन्न
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा