*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
*दिव्यांगाचे ५% थकीत निधी १० ऑक्टोबर २०२६ प्रिंट देण्याचे लेखीआश्वासन दिल्यामुळे १९ सप्टेंबर २०२६ रोजीचे माजी सैनिक सावंत शिवाजी रामकृष्ण यांचे दुसऱ्यांदा उपोषण आंदोलन तात्पुरते स्थगित; मुदतीनंतर संपूर्ण दिव्यांमध्ये नाही दिल्यास ग्रामपंचायतला ताळे लावणार सावंत यांनी इशारा देण्यात आला आहे
तुळजापूर तालुक्यातील मौजे तामलवाडी येथील
ग्रामपंचायतीला आपल्या स्व-उत्पन्नातून ५ टक्के निधी दिव्यांग (अपंग) कल्याणकारी योजनांवर खर्च करणे बंधनकारक आहे. हा नियम केंद्र शासनाच्या दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ मधील तरतुदीनुसार आणि महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार लागू आहे जो निधी ग्रामपंचायत कार्यालय तामलवाडी यांनी मागील दोन वर्षापासून दिव्यांग बांधव व भगिनीकरिता खर्च केलेला नसून तो १५ ऑगस्ट २०२६ पूर्वी देण्याकरिता उपोषण आंदोलनाचा इशारा देऊनही न दिल्यामुळे दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तामलवाडी चे संस्थापक अध्यक्ष तथा माजी सैनिक सावंत शिवाजी रामकृष्ण यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण आंदोलन केले होते त्याद्वारान प्रशासक सौ नूरबानू सिकंदर बेगडे व ग्रामपंचायत अधिकारी श्री चैतन्य गोरे यांनी ०७ (सात) दिवसात सन २०२४-२५ व २०२५-२६ चा ५% दिव्यांग निधी वरिष्ठ कार्यालयाचे मार्गदर्शन घेऊन वाटप करून संपूर्ण माहिती आपणास उपलब्ध करून देण्यात येईल असे लेखी आश्वासन देऊनही त्याप्रमाणे कारवाई न झाल्यामुळे श्री सावंत यांनी दुसऱ्यांदा एका लेखी निवेदनाद्वारे उपोषणाचा इशारा देऊन दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता ग्रामपंचायत कार्यालय तामलवाडी समोर उपोषण करण्याचा इशारा मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूर व ग्रामपंचायत कार्यालय तामलवाडी यांना दिलेला होता त्याप्रमाणे दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता ग्रामपंचायत कार्यालय तामलवाडी समोर उपोषण चालू असताना दुपारी एक वाजता पंचायत समिती तुळजापूर विस्तार अधिकारी (पं) श्री ताटे एस.ए. व ग्रामसेवक चैतन्य गोरे यांनी श्री सावंत यांची गावकऱ्यासमोर भेट घेऊन दिव्यांग बांधवांचा निधी वाटपाकरता चर्चा करून उशीर होत असल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून एक महिन्याची मुदत मागितली या प्रकरणी श्री सावंत यांनी लवकरेशी चर्चा करून मुदत दिली जाईल परंतु जर त्याचा आता दुसऱ्यांदा लेखी आश्वासनाचे पालन नाही झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयला तामलवाडीला कायमचे टाळे लावले जाईल त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील व पंचायत समितीवर पुढील आंदोलन केले जाईल असा इशारा देऊन दिव्यांग निधी वाटपाकरिता एक महिन्याचे मदत वाढ देण्यात आले त्यामुळे तामलवाडी मधील दिव्यांग बांधवांना त्यांचा निधी मिळण्याच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत.
शनिवार, १९ सप्टेंबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
*दिव्यांगाचे ५% थकीत निधी १० ऑक्टोबर २०२६ प्रिंट देण्याचे लेखीआश्वासन दिल्याने १९ सप्टेंबर २०२६ रोजीचे उपोषण आंदोलन तात्पुरते स्थगित; मुदतीनंतर न दिल्यास ग्रामपंचायतला ताळे लावणार-- शिवाजी सावंत*
*दिव्यांगाचे ५% थकीत निधी १० ऑक्टोबर २०२६ प्रिंट देण्याचे लेखीआश्वासन दिल्याने १९ सप्टेंबर २०२६ रोजीचे उपोषण आंदोलन तात्पुरते स्थगित; मुदतीनंतर न दिल्यास ग्रामपंचायतला ताळे लावणार-- शिवाजी सावंत*
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा