*अकलूज प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
स्वामी समर्थ महाराज यांच्या सर्व भाविक भक्तांना अत्यंत आनंदाने व भक्तिभावाने कळविण्यात येत आहे की, आपल्या अकलूज नगरीत सालाबादप्रमाणे आपल्या अकलूज नगरीमध्ये दिनांक ४ जुलै २०२६ रोजी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावन पालखीचे व पादुकांचे आगमन होत आहे. या मंगलमय प्रसंगी अभिषेक व पाद्यपूजनाचे आयोजन करण्यात आले आहे.या पवित्र सोहळ्यास आपण सर्व भाविक भक्तांनी सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून स्वामींच्या पादुका दर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे कार्यक्रमाची रूपरेषा व आयोजन दिनांक ०४|०७|२०२६ रोजी चार वाजता अकलूज येथील माळीनगर रोड वरील नाक्याजवळ पादुकांचे आगमन होणार असून ४:३० वाजता पालखी चे विठ्ठलमंदिर येथे आगमन होऊन सायंकाळी ०७ वा.आरती सौ.व.श्री.शर्मिलादेवी किशोरसिंह माने पाटील हस्ते होणार आहे त्या दिवशी पालखी विठ्ठल मंदिर मुक्कामी राहणार आहे तसेच दिनांक ,५ जुलै पहाटे ६ होणार आहे तरी याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन
-श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा अकलूज सेवेकरी. यांनी केले आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा