Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२६

सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नवीन ४२ व्या करमाळा शाखेचे गुरुवारी उद्घाटन नानासाहेब जाधव यांच्या हस्ते उद्घाटन; नगराध्यक्षा मोहिनीताई सावंत यांची प्रमुख उपस्थिती

 *करमाळा तालुका-- प्रतिनिधी* 

     *आलिम. शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड, सोलापूर या मल्टीस्टेट शेड्युल्ड सहकारी बँकेच्या नवीन ४२ व्या करमाळा शाखेचा उद्घाटन समारंभ गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

करमाळा शहरातील शहा (जवळकर) हॉस्पिटल शेजारी, मेन रोड येथे बँकेची ही नवीन शाखा सुरू होत असून, या शाखेमुळे करमाळा शहर व परिसरातील नागरिकांना आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध होणार आहेत.

या शाखेचे उद्घाटन पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रांत संचालक नानासाहेब जाधव यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास करमाळा नगराध्यक्षा मोहिनीताई सावंत तसेच जिल्हा संचालक, पंढरपूर डॉ. रमेश सिद यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

यावेळी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे, उपाध्यक्ष ॲड. मिलिंद कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे, शाखा व्यवस्थापक गणेश उंबेळकर यांच्यासह बँकेचे संचालक मंडळ उपस्थित राहणार आहे.

सहकार, विश्वास आणि आर्थिक प्रगतीचा नवा अध्याय सुरू करताना करमाळा शाखेच्या उद्घाटन सोहळ्यास नागरिक, व्यापारी, उद्योजक व बँकेच्या हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सोलापूर जनता सहकारी बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा