उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
आषाढी एकादशीनिमित्त फिनिक्स इंग्लिश प्री-प्रायमरी स्कूल २५/४, लवंग येथे बालदिंडीचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी संत, वारकरी, विठ्ठल-रुक्मिणी यांच्या आकर्षक वेशभूषेत सहभागी होत संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून टाकला.
"ज्ञानोबा-तुकाराम" आणि "जय जय राम कृष्ण हरी" च्या गजरात विद्यार्थ्यांनी टाळ, भगवे झेंडे आणि तुळशी वृंदावन घेऊन दिंडी काढली. या प्रसंगी विद्यार्थ्यांना संतपरंपरा, भक्ती, संस्कार, एकता आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
संस्थापक अध्यक्षा नूरजहाँ शेख यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक ज्ञानाबरोबरच सांस्कृतिक व नैतिक संस्कारही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मनोगत व्यक्त केले. शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक केले.
या बालदिंडीमुळे चिमुकल्यांमध्ये भक्ती, संस्कार आणि आपल्या समृद्ध परंपरेबद्दल अभिमानाची भावना निर्माण झाली.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी लवंग गावाचे मा.सरपंच निशांत दादा पाटील ,रणजित चव्हाण,पालक संघाचे अध्यक्ष योगेश शेंडगे ,उपाध्यक्ष सोमनाथ चव्हाण , गुलशन शेख,शीतल भुजबळ,व बहुसंख्येने पालक उपस्थित होते.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा