Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २९ जुलै, २०२६

*अविरतपणे अडीअडचणीच्या वेळी सर्वांसाठी मदतीसाठी धावून येणारे सामाजिक कार्यकर्ते --जावेद बाबा तांबोळी*

 *मुख्य संपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

  *मो:-9730867448*




आज आमचे मित्र, (जननायक), सामाजिक कार्यकर्ते, समाजामध्ये विविध कार्यक्रम सामाजिक उपक्रम तसेच गोरगरिबांना नेहमी मदतीचा हात पुढे करून लोकांच्या  मनामध्ये एक वेगळी छाप निर्माण करून घर केलेले आमचे मित्र जावेद बाबा तांबोळी यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या काही कार्यक्रमाची लोकांना केलेल्या मदत व  कार्याची जे आम्हाला माहित आहे ते सांगण्याचा प्रयत्न करत आहोत

 संघर्षातून यशापर्यंत 

 जावेद बाबा तांबोळी हा एका गरीब कुटुंबातील व्यक्ती असून लहानपणी त्यांची आई वडील त्यांना सोडून देवा घरी गेले त्या दिवसापासून त्यांना त्यांचे मामा इनुस भाई जमादार यांचे सहकार्य लागले व त्यांना प्रत्येक वेळेस मदतीचा हात त्यांनी पुढे केला मामाच्या सल्ल्यानुसार त्यांनी सुरुवातीला व्यवसाय म्हणून स्वतःची रिक्षा चालू केली समाजाबद्दल काहीतरी करणे ही त्यांची आवड त्यांना नेहमी झोपू देत नव्हती त्यावेळेस सुद्धा त्यांनी आदरणीय विजय दादा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीला त्यांनी एकता गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली त्यामध्ये त्यांनी त्यांचे सहकार्याच्या माध्यमातून मुलांना शालेय वस्तू वाटप करणे,खाऊ वाटप करणे असे उपक्रम राबवण्यात आले त्यांची हे कार्य करण्याची पद्धत बघून शिव कीर्ती युवा मंचच्या अकलूज शहर सचिव पदी त्यांची निवड झाली त्या निवडीनंतर त्यांनी शिव कीर्ती युवा मंच माध्यमातून गोरगरिबांना महिलांना साडी वाटप, अन्न वाटप, दवाखान्याचा खर्च उचलणे इत्यादी उपक्रम राबवण्यात आले, त्यांचे सतत ह्या त्यामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ महाराष्ट्र सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली या पदाचा त्यांनी गोरगरिबांसाठी व त्यांच्या अधिकारासाठी खूप प्रामाणिकपणे काम केले त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांनी राष्ट्रवादी माळशिरस तालुका अल्पसंख्यांक सेलच्या तालुका अध्यक्षपदी त्यांची निवड केली तो पदभार स्वीकारत असताना त्यांच्यावर विश्वास ठेवून आदरणीय विजय सिंह मोहिते पाटील साहेब यांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोलापूर अल्पसंख्यांक सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली त्यांनी त्या पदावरील प्रामाणिकपणे काम चालू ठेवले त्यानंतर त्यांना ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पद बहाल करण्यात आले. पण त्यांची आवड राजकारणापेक्षा नेहमी समाजकारणावर जास्त होती त्यांच्या या कामाची दखल घेत मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पद त्यांना मिळाले आपण समाजाशी काहीतरी देणे लागत आहोत ही गोष्ट त्यांना नेहमी कार्याची जाणीव करत देत असेल त्यामुळे त्यांना नेहमी वरिष्ठांचा ( मोहिते पाटील परिवारांचा ) वेळोवेळी मार्गदर्शन मिळत गेले आणि आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एकता बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य ही संस्था स्थापन केली ही संस्था स्थापन करत असताना त्यांना विविध अडचणी आल्या परंतु त्या सर्व अडचणीवर मात करत त्यांनी ही संस्था उभी केली त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी कोरोना काळासारख्या काळामध्ये लोकांना जवळजवळ सहा हजार लोकांना त्यांना त्यांच्या जागी जाऊन डबे देणे, ॲम्बुलन्स वेळेवर उपलब्ध करून देणे, बेड उपलब्ध करून देणे,रेड डीसिमर इंजेक्शन उपलब्ध करून देणे, व्हेंटिलेटर उपलब्ध करून देणे, कोरोनाच्या काळात लोकांचा व्यवसाय बंद असल्यामुळे अन्नदानाचे किट व  खाण्याचे सामान उपलब्ध करून देणे असे विविध कार्यक्रम केले कोरोनाच्या काळात ज्या ज्या लोकांनी कोरोनाग्रस्त लोकांना मदत केली त्या सर्व लोकांना कोरोना योद्धा म्हणून आदरणीय विजय दादा यांच्या हस्ते सन्मान मिळवून दिला, डॉक्टर,वकील, इंजिनियर, यासारखे अनेक क्षेत्रातील लोकांना त्यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानपत्र (सन्मान सोहळा) घेतला शाळेमध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना कुठेही अडचण आली तर पुढे होऊन त्यांचे ऍडमिशन असू द्या किंवा ॲडमिशन साठी लागणारे पैशाची किंमत असू द्या त्यांनी त्यांच्या सहकार्यातून ते सगळे कामे पूर्ण केले प्रत्येक समाजामध्ये एक तरी महापुरुष असतोच त्या महापुरुषांच्या जयंतीचा कार्यक्रम असो किंवा पुण्यतिथी चा कार्यक्रम असो या सर्व कार्यक्रमांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा असतो त्यामुळे यांच्या या सर्व कामाची काम करण्याची पद्धत पाहून त्यांना आदरणीय विजय दादा यांच्यामार्फत छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड माळशिरस अध्यक्ष पदी निवड करण्यात आली हा लेख लिहिण्या पाठीमागचा उद्दिष्ट एवढेच होते की एका लहान कुटुंबात जन्माला आलेल्या व्यक्ती जर का आपल्या समाजासाठी एवढे सर्व करू शकतो तर त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याच्या कार्याची उजळणी का करू नये म्हणून माझ्या मनात जे होते माझ्या समोर जे कार्य झाले त्या कार्य मी या लेखांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज ह्याचा मार्फत माझ्या तर्फे जावेद बाबांना वाढदिवसाची भेट ईश्वरचरणी मी एवढेच प्रार्थना करतो की हे ईश्वर जावेद बाबांना दीर्घायुष्य लाभो व त्यांच्या कामाला असेच यश मिळत राहो आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा बाबा पुन्हा एकदा हॅपी बर्थडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा