Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२६

*स्वर्गीय चाँदसो सय्यद परिवाराकडून त्यांच्या स्मरणार्थ व प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त 119 पुस्तकांचा संच संकेतिका सार्वजनिक वाचनालयास भेट*

 *अकलूज-- प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


दिनांक 26 ऑगस्ट 2026 रोजी राऊत नगर अकलूज येथील  संकेतिका सार्वजनिक वाचनालयास स्वर्गीय चाँदसाहेब मिटू सय्यद यांच्या स्मरणार्थ सय्यद परिवाराच्या वतीने ईद-ए-मिलाद च्या पवित्र सणाचे औचित्य साधून 119 प्रेरणादायी पुस्तकांचा संच भेट देण्यात आला या सोहळ्यास संपूर्ण सय्यद परिवार  संकेतिका वाचनालयाचे अध्यक्ष मारुती क्षीरसागर , सचिव व सर्व संचालक मंडळ तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अकलूज नगर परिषदेच्या नगरसेविका  सौ.वैशाली  धनाजी भोसले ,कथाकार लेखक विरेंद्र पत्की , गणपत जाधव , दिलीप मुळे ,डॉक्टर प्रेमनाथ रामदासी, तसेच पत्रकार  हुसेन मुलाणी , डॉक्टर ज्ञानेश्वर पाटील,  भास्कर जोशी ,केंद्रप्रमुख जावेद मुलाणी , राऊतनगरचे कार्यकर्ते  हमीद मुलाणी .  बाळासाहेब वाघे,  अशोक राजगुरू तसेच पत्रकार ,वकील,  शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी श्री भास्कर जोशी यांचेकडून  संकेतिका वाचनालयास 5001 रुपये आर्थिक साह्य देण्यात आल


   याप्रसंगी उपस्थित अनेक मान्यवरांनी मारुती क्षीरसागर गुरुजी यांनी वाचनालया साठी दिलेले योगदान आणि अहोरात्र त्यासाठी करत असलेले प्रयत्न प्रयत्ना बाबत कौतुक केले  केले असून आजच्या आधुनिकीकरण आणि तंत्रज्ञानाच्या युगात मान्यवरांची पुस्तके उपलब्ध करून वाचनालयास जीवदान देणे हे तारेवरची कसरत केल्याप्रमाणे असून ती कसरत क्षीरसागर गुरुजी करत असल्याचे दिसून येते वाचाल तर वाचाल हे ब्रिद वाक्य उराशी बाळगून क्षीरसागर गुरुजी तरुण पिढीत वाचनाची आवड निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत ही बाब अनुकरणीय आहे

 तसेच या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  दत्तात्रय गायकवाड सर यांनी केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा