Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २३ ऑगस्ट, २०२६

भोंदू मनोहर मामा भोसले प्रकरणी प्राध्यापक रामदास झोळ यांचा बार्शी न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला.

 *करमाळा तालुका --प्रतिनिधी*

  *आलिम शेख*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी*


दत्तकला शिक्षण संस्थेची धर्मादाय आयुक्त, शिक्षण व आयकर विभागा मार्फत चौकशी सुरू. प्रा. रामदास झोळ यांचा जामिन अर्ज फेटाळला. प्रा.झोळ यांच्या अटकेसाठी विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करण्यात आले आहे भोंदू मनोहर भोसले यांच्याशी कथित आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा रामदास झोळ व सचिव माया झोळ या पती-पत्नीवर गुन्हा दाखल झाला आहे‌ माया झोळ यांना पोलिसांनी अटक केली असून रामदास झोळ अद्यापही फरार आहेत. अशातच रामदास झोळ यांचा अटकपूर्व जामीन बार्शी न्यायालयाने फेटाळला आहे. भोंदू मनोहर भोसले च्या कथित अवैध पैशांची विल्हेवाट लावण्यात सहभाग असल्याचेही पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने दत्तकला शिक्षण संस्थेची धर्मादाय आयुक्त, शिक्षण विभाग व आयकर विभाग या तीनही यंत्रणामार्फत चौकशी सुरू आहे.यामुळे प्रा.रामदास झोळ यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी.. भोंदू मनोहर भोसले याच्या पैशाची विल्हेवाट लावल्याच्या आरोपावरून दत्तकला शिक्षण संस्थेतील कर्मचारी राजेंद्र हुंबे लक्ष्मीकांत लिगाडे रामदास झोळ त्यांची पत्नी माया झोळ यांना अटक केली. तिन्ही आरोपींना माढा न्यायालयाने 21 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी तिघांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.दरम्यान प्रा .रामदास झोळ यांचा अटकपूर्व जामीन बार्शी न्यायालयाने फेटाळला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा