Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२६

*निमगावच्या माळरानावर कृषिमंत्री भरणे मामांनी वावडी उडविण्याचा मनमुराद आनंद घेतला.* वावडी व हिरकणी महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा.

 *अकलूज प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी



महाराष्ट्रातील माळशिरस तालुक्यातील एकमेव निमगाव (मगराचे) हे गाव.या ठिकाणी होणाऱ्या वावडी महोत्सवात महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री ना. दत्तात्रय भरणे मामांनी मोठ्या उत्साहात सहभागी होऊन निमगावच्या माळरानावर ५ फुटांपासून ते ३० फुटांपर्यंतच्या वावड्या उडविण्याचा मनमुराद आनंद घेतला या वावडी महोत्सवात ३ ते ४ हजार तरुणांचा सहभाग होता तर हिरकणी महोत्सवात ११०० महिलांनी आपला सहभाग नोंदविला.श्रावण महिन्यात नागपंचमीनिमित्त निमगाव वावडी व हिरकणी महोत्सव संयोजन समितीच्या वतीने गेल्या ७ वर्षापासून या महोत्सवाचे आयोजन केले जात आहे.२०२६ च्या महोत्सवासाठी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची उपस्थिती होती.महिला भगिनींसाठी पारंपारिक खेळ नागपंचमीनिमित्त आयोजित करून त्यांना  विशेष गृहपयोगी बक्षिसे दिली जातात.


           सन २०२६ च्या वावडी महोत्सवात छोट्या गटात धर्म रक्षक ग्रुप शुभम मगर,हनुमंत जगताप,शंभूराजे ग्रुप,मैत्री ग्रुप दत्तात्रेय देशमुख,छावा प्रतिष्ठान शंभुराजे मगर,मोरया ग्रुप मनोज दोशी,क्रांतीसुर्य ग्रुप यांनी बक्षिसे मिळविले तर मध्यम गटात जाणता राजा,शिवशक्ती प्रतिष्ठान क्रांतीसिंह मगर,छत्रपती ग्रुप साहिल माने,छत्रपती ग्रुप थोरात ,६५ ग्रुप पृथ्वीराज मगर हे विजेते ठरले तर मोठ्या गटात शिवतांडव होय हिंदूच छत्रपती संभाजी प्रतिष्ठान होलार गल्ली लहुजी ग्रुप मल्हार प्रतिष्ठान हे विजेते ठरले.



           हिरकणी महोत्सवात संध्या अजय वसव यांनी प्रथम क्रमांक मिळवून पिठाची चक्की बक्षीस मिळविले तर स्नेहल पाटील व आरती ढवळे या द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या ठरल्या असून त्यांना गॅस शेगडी भेट देण्यात आली.पैठणीच्या मानकरी आकांक्षा पवार,नेहा जाधव,अर्चना मगर ठरल्या चौथ्या क्रमांकाच्या हॅन्ड मिक्सरच्या मानकरी सोनाली ढवळे,स्नेहल पाटील,हर्षदा पवार व सुजाता मगर मानकरी ठरल्या दीक्षा साळुंखे,शितल बोडरे, निलोफर शेख,वैष्णवी कुंभार,रोहिणी जाधव या पाचव्या क्रमांकाच्या विजेत्या ठरल्या सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आली

         या कार्यक्रमासाठी राज्याचे कृषिमंत्री ना.दत्तात्रय भरणे,ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.एम.एम.मगर,डॉ. एम.के.इनामदार,ॲड.सोमनाथ वाघमोडे,माळशिरस पं.स.मा. उपसभापती किशोर सुळ, भाजपाचे मंडल अध्यक्ष सुजयसिंह माने-पाटील, राजाभाऊ बोडके,संजय देशमुख,राष्ट्रवादीचे रमेश पाटील, शिवप्रसाद उद्योग समूहाच्या ऋतुजा मोरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. निमगाव वावडी व हिरकणी महोत्सव संयोजन समितीच्या वतीने कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.


*चौकट*

*हिरकणी महोत्सव कार्यक्रमात ऐन वेळेस मुसळधार पावसाची इंन्ट्री.*

हिरकणी महोत्सवातील होम मिनिस्टर कार्यक्रमाचे अँकर नितीन गवळी यांचा कार्यक्रम सुरू असताना मुसळधार पावसाने एक तास हजेरी लावली.या कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांनी व मुलींनी 

हलगीच्या तालावर पावसात भिजत नृत्य करून पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला.तर काही महिलांनी बसायला दिलेली खुर्ची डोक्यावर घेवून पावसापासून बचाव केला. या कार्यक्रमातून एक महिला ही घरी गेली नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा