Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२६

निंभोरे ग्रामपंचायतची ग्रामविकास व वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या मुद्द्यावर ग्रामसभा* खेळीमेळीच्या वातावरणात ग्रामसभा संपन्न

 *करमाळा तालुका --प्रतिनिधी*

  *आलिम शेख*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी*


सोमवारी दि. 24/08/2026 रोजी ग्रामसभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.या ग्रामसभेत वैयक्तिक लाभाच्या योजनाची माहिती सरपंच रविदादा वळेकर यांनी दिली.

 यामध्ये मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना, महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांचे कडील पिठाची गिरणी, पिकोफॉल मशीन, 5 वी ते 12 वी मुलींना सायकल चे अर्ज, पिठाची गिरणी,कांडप यंत्र,10 वी पास महिलांना संगणक प्रशिक्षण इत्यादी योजनांची माहिती दिली.


    तसेच दिव्यांग बांधवांना शेळीपालन गटखरेदी,झेरॉक्स मशीन, ई-बाईक, अतितीव्र (80% पेक्षा जास्त)दिव्यांग पाल्यांच्या पालकांना मदत/अनुदान, दिव्यांगांना अन्न व खाद्य वाटप, या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, दिव्यांग स्वयंसहायता समूह यांना व्यावसायाकरिता अर्थसाहाय्य, पिठाची गिरणी आदी योजणांची माहिती दिली.

                  तसेच घरकुलाची प्रधानमंत्री आवास योजना या योजनेचा सर्व्हे झालेली यादी वाचून ग्रामसभेची मंजुरी घेतली. तसेच ज्यांना आजपर्यंत घरकुल मिळाले नाही, त्या लाभार्थ्यांची नावे यादीत समाविष्ट केली.

   तसेच विकसित भारत रोजगाराची हमी व आजीविका अभियान ग्रामीण V. B.G. RAMG अंतर्गत गावविकास आराखडा तयार करणे, फळबाग लागवडीचे लाभार्थी निवडणे आदी विषयावर चर्चा झाली.

        तसेच पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2019 चे तालुका स्तरीय प्रथम क्रमांकाचे बक्षीस रक्कम शिल्लक आहे. त्यावर मार्गदर्शन सूचनेनुसार कामे करायचे ठरले.

             तसेच आयत्या वेळी आलेल्या विषयावरही चर्चा झाली. अतिक्रमण, ग्रामविकास संबंधी विकासकामे, पुढील नियोजन आदी विषयावर चर्चा झाली.

         ग्रामसभेच्या अध्यक्ष स्थानी सरपंच रविदादा वळेकर होते तर सचिव पदी लिपिक दिलीप मुळे यांनी काम पहिले. ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचा बहिष्कार असल्याने लिपिक यांची सचिव पदी नियुक्ती करण्यात आली होती.

          या ग्रामसभेला सरपंच, उपसरपंच, सदस्य,  ग्रामस्थ, युवक,आजी माजी पदाधिकारी,कृषी सहाय्यक अधिकारी महेश कोकरे साहेब सरकारी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकंदर पाहता 25 ऑगस्ट रोजी पार पडलेली निंभोरे येथील ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात व उत्साहात संपन्न झाली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा