नूरजहाँ शेख - उपसंपादक
टाइम्स 45 न्युज मराठी
फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये आय चॅम्प अबॅकस स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून चॅम्पियन ठरलेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा उत्साहात पार पडला. मान्यवर डॉ.मनीषा माने शेंडगे तसेच शिवपार्वती माध्यमिक शाळा बाभुळगाव चे संस्थापक अध्यक्ष अनिल पवार सर व प्राथमिक शाळा गट नं. तीन च्या मुखुध्यापिका सौ.लतिका नागटिळक व फिनिक्स स्कूल संस्थापक अध्यक्ष नूरजहाँ शेख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.वल्लभ कोळेकर ,आयशा कोरबु या विद्यार्थ्यांनी सुपर इंटेलीजंट तर विश्र्वपरी दगडे ,सोहम जगताप , तास्मिया शेख ,यांनी प्रथम क्रमांक मिळविला,अमृता वाघमारे , रीजा शेख,समर्थ वाघमारे,अदिती चव्हाण,गुरूराज कोळेकर,शर्वरी रेडे ,जोया शेख, आहन शेख,असद शेख ,रूद्रप्रताप चव्हाण ,उत्कर्षा शिंदे,श्रावणी पारसे अन्वीता कोळेकर,जुनेद पठाण, माहीरा शेख ,अफान शेख नुबेद मुलाणी,आहिल शेख,यांनी उत्कृष्ठ गुण मिळविले.
यावेळी सर्व चॅम्पियन विद्यार्थ्यांना फळझाडांची रोपे, वह्या व पेन देऊन त्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम नूरजहाँ शेख यांनी राबविला.
विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य मोलाचे असल्याचे मान्यवरांनी सांगितले. या कौतुक सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यशाची शिखरे गाठता येतात, असा प्रेरणादायी संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा