Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १९ ऑगस्ट, २०२६

अकलूज नगरपरिषदेचे बेकायदेशीर डम्पिंग ग्राउंड तात्काळ हलवा; 'सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघा'चा प्रशासनाला इशारा

 *अकलूज --प्रतिनिधी* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-9730867448*


अकलाई स्मशानभूमी शेजारी असलेल्या आणि दाट लोकवस्तीजवळ बेकायदेशीररीत्या सुरू असलेले घनकचरा डम्पिंग ग्राउंड नगरपरिषदे तात्काळ हलवून नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ प्रशासनाने तातडीने थांबवावा, अशी आक्रमक मागणी सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने यांनी केली आहे. संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भाई कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी (SDO), अकलूज यांना यासंदर्भात प्रशासकीय निवेदन सुपूर्द करण्यात आले.



माहितीच्या अधिकारात (RTI) समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार, अकलूज नगरपरिषदेचे हे डम्पिंग ग्राउंड मूळची गायरान (गाय-गुरांच्या चरण्यासाठी आरक्षित) महसूल विभागाची जमीन व्यापून बेकायदेशीरपणे चालवले जात असल्याचे उघड झाले आहे.



आरोग्याला धोका आणि जलप्रदूषणाचा गंभीर प्रश्न

विषारी धुरामुळे श्वसनाचा त्रास: डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याला अज्ञात व्यक्तींकडून वारंवार आगी लावल्या जात आहेत. यामुळे निघणाऱ्या विषारी धुरामुळे अकलाई मंदिर परिसरातील नागरिक  लहान मुले, वयोवृद्ध आणि नागरिकांना श्वसनाचा व दम्याचा (धाप लागण्याचा) तीव्र त्रास सहन करावा लागत आहे. नगरपरिषद नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे

नीरा नदी अन् चंद्रभागेचे पावित्र्य धोक्यात धोक्यात आले आहे हे डम्पिंग ग्राउंड नीरा नदीकाठी असल्याने, पुराच्या पाण्यात कचरा वाहून जातो. नीरा आणि भीमा संगमातून हे दूषित पाणी थेट पंढरपूरच्या चंद्रभागेत मिसळते. आषाढी, कार्तिकी व एकादशीला लाखो वारकरी याच पाण्याचा प्राशन आणि स्नान करतात, ज्यामुळे वारकऱ्यांच्या श्रद्धेशी आणि आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

प्रशासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष: महसूल विभागाची जागा असतानाही संबंधित अधिकारी डोळेझाक करत आहेत का? असा थेट सवाल उपस्थित करत, बेकायदेशीर डम्पिंग ग्राउंड चालवणाऱ्या नगरपरिषदेवर जिल्हा प्रशासन काय कारवाई करणार, याकडे संपूर्ण अकलूजकरांचे लक्ष लागले आहे.

वरिष्ठ प्रशासनाकडे निवेदनाच्या प्रती या गंभीर समस्येवर कायदेशीर कारवाई करून डम्पिंग ग्राउंड त्वरित हलवण्यासाठी संघाच्या वतीने जिल्हाधिकारी सोलापूर, सहाय्यक आयुक्त (नगरपरिषद प्रशासन) सोलापूर, यांना व्हाट्सअप द्वारे निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आले आहे उपविभागीय अधिकारी अकलूज आणि तहसीलदार माळशिरस यांना निवेदनाच्या प्रती समक्ष भेटून देण्यात आले आहेत.

 वेळी पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने यांच्यासह शशिकांत नवरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. नागरिकांचे आरोग्य आणि पवित्र नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी हे डम्पिंग ग्राउंड तात्काळ न हलवल्यास प्रशासनाविरोधात तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा