उपसंपादक
नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
दि माॅडेल विविधांगी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, माळीनगर येथे भारत सरकारच्या नशामुक्ती अभियानांतर्गत ब्रह्माकुमारी संस्थेच्या अकलूज सेंटरच्या संचालिका ब्रह्मकुमारी शिवराञी बहनजी सहयोगाने विद्यार्थ्यांसाठी नशामुक्ती जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी विद्यालयातील सुमारे १८०० विद्यार्थ्यांनी नशामुक्तीची शपथ घेत व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प केला.
‘व्यसनमुक्त अभियान व मूल्यवान जीवन’ या विषयावर बहनजी म्हणाल्या की,मनाची एकाग्रता करण्यासाठीच मेडिटेशन केले पाहिजे.आपले विचार शक्तीशाली सकारात्मक कसे करायचे ही प्रात्यक्षित दाखवले व्यसनांचे शरीर, मन, कुटुंब आणि समाजावर होणारे दुष्परिणाम स्पष्ट करत निरोगी, आनंदी व मूल्याधिष्ठित जीवन जगण्याचे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी आजपासूनच व्यसनांना नकार देत आपल्या मित्र-परिवारातही व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
भारत सरकार आणि ब्रह्माकुमारी संस्थेच्या सहयोगातून राबविण्यात येणाऱ्या नशामुक्ती अभियानाच्या माध्यमातून युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागृती निर्माण करण्याबरोबरच त्यांना सकारात्मक आणि मूल्यवान जीवनाची दिशा देण्याचे कार्य केले जात आहे. अनगर विद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग या अभियानाला निश्चितच बळ देणारा ठरला.
या कार्यक्रमास ब्रह्माकुमारी परिवारातिल नरेंद्रभाई घाडगे, प्रतापभाई राऊत, सतीश झगडे,जयश्री झगडे, छाया यादव, प्राचार्य कलाप्पा बिराजदार, उपप्राचार्य रितेश पांढरे, पर्यवेक्षक सुनील जवरे व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन आतकर यांनी केले.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा