*करमाळा तालुका --प्रतिनिधी*
*आलिम शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा येथे येथे 15 ऑगस्ट 2026 अर्थात स्वातंत्र्यदिनी मुस्लिम समाजाचा तीन तालुक्याचा इस्तेमा मुस्लिम मेळावा असल्याची माहिती मुस्लिम समाजाचे धर्मगुरू यांनी दिली सदरचा इस्तेमा हा कर्जत रोडवरील धर्म संगीत मंगल कार्यालय मध्ये संपन्न होणार आहे
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा बार्शी तसेच माढा या तीन तालुक्यांचा इस्तेमा धर्मसंगीत मंगल कार्यालय मध्ये सकाळी सात ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत चालणार आहे यामध्ये जिल्ह्यातील तसेच राज्यातील मुस्लिम धर्मगुरू मुस्लिम समाजाला संदेश तसेच उपदेश देणार आहे सदरचा इस्तेमा हा शांततेच्या मार्गाने होणार असून यामध्ये करमाळा शहर व तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने हजर राहून तसेच धर्मगुरु चा प्रवचनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन मुस्लिम समाजातील धर्मगुरू यांनी केले आहे
येत्या 15 ऑगस्ट दिनी होणाऱ्या इस्तेमा साठी करमाळा शहरातील मुस्लिम समाजाने मोठी तयारी केली असून यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा करमाळा तसेच बार्शी या तालुक्यातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा